Maza Avadta Chand Essay in Marathi | माझा आवडता छंद क्रिकेट

Maza Avadta Chand Essay in Marathi – आजच्या लेखात आपण माझा आवडता छंद – या विषयी निबंध लिहणार आहोत. तर आवड म्हणजे छंद एक अशी गोष्ट ज्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळणे.मग ते कोणत्याही गोष्टीतून आपल्याला समाधान मिळू शकते जसे की वाचन, लेखन, चित्रकला, नृत्य, गायन, फोटोग्राफी, भटकंती, स्वयंपाक,यापैकी कोणत्याही गोष्टीची आवड असणे म्हणजे छंद. या छंदामुळे आपल्याला शांती मिळत असते. आवड आपल्या आयुष्यात एक संधि ऊर्जा आणि उत्साह देते.
माझा आवडत छंद क्रिकेट आहे. याची मला लहानपणापासूनच जाणीव झाली आहे आणि मी ती जपत आहे. यांमुळे मला खूप आनंद होतो. क्रिकेट मुळे माझी एक वेगळी ओळख झाली आहे. तर माझा आवडता छंद क्रिकेट या वर निबंध लिहूया …

Maza Avadta Chand Essay in Marathi | माझा आवडता छंद मराठी निबंध

Maza Avadta Chand Essay in Marathi – माझा आवडता छंद क्रिकेट

माझा आवडता छंद : क्रिकेट

क्रिकेट हा असा खेळ आहे जो जगभरात लोकप्रिय आहे आणि हा खेळ खूप रोमांचक आहे. हा खेळ जगभरात खेळला जातो. क्रिकेट मध्ये एकूण ११ खेळाडूंची निवड केलेली असते. या खेळातील प्रत्येक खेळाडूची भूमिका वेगवेगळी असते आणि त्या सोबतच प्रत्येकाचे योगदान ही तितकेच महत्त्वाचे असते. क्रिकेट संघातील काही महत्वाचे खेळाडू आणि त्याची भूमिका :

महत्वाचे खेळाडू : कर्णधार (Captain),उपकर्णधार (Vice-Captain), फलंदाज (Batsmen),गोलंदाज (Bowlers)यष्टिरक्षक (Wicket-Keeper)

क्रिकेट खेळायला मला खूप आवडते. हा खेळ माझ्यासाठी अतिशय प्रिय आहे. मला या खेळाची आवड लहानपणापासूनच निर्माण झाली. क्रिकेट म्हटले की मला खूप आनंद होतो. क्रिकेट खेळले की माझ्यात एक ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो. माझ्या साठी हा नुसता खेळ नसून त्यातून मला प्रेरणा मिळते आणि क्रिकेटमुळे माझी मानसिक,शारीरिक स्थिति बरोबर राहते.

लहानपणी मी T. V. वर क्रिकेट खूप बगायचो, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनीमला आणि असेच बरेच खेळाडू माझे प्रिय खेळाडू होते . त्याच्या मुळे माझ्यात ही आवड निर्माण झाली ते माझे प्रेरणा स्थान आहे. या खेळाची आवड आणि प्रेरणा सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या खेळातून झाली. त्यामुळे मला या खेळाची लहानपणापासूनच आवड असल्यामुळे मी आणि माझे मित्र शाळेच्या सुट्टीत आम्ही शाळेच्या मैदानात एकत्र येऊन क्रिकेट खेळायचो.आणि सुट्टीच्या दिवशी खुल्या मैदानात, गल्लीतील मोकळे रस्ते, किंवा घराच्या आवारात आम्ही हा खेळ आनंदाने खेळत असतो. आम्ही खेळत असतात आमच्याकडे 2बॅट, 3बॉल, आणि विकेट्स चे जास्तीचे समान आम्ही आमच्या सोबतच ठेवत असतो. त्यामुळे हा खेळ आम्ही बिंदास्तपणे खेळू शकतो. आणि मज्जा घेत असतो.

क्रिकेटमुळे माझी मी शारीरिक तब्येत ठीक राहते रोज थोडे थोडे खेळले मी माझे मन प्रसन्न राहते. आणि आनंदाने मी माझा बाकीच्या गोष्टी पण करून घेते. या खेळामुळे आपल्याला खूप फायदा होतो. क्रिकेट खेळतांना धावणे, उडी मारणे, बॉल झेलणे, अश्याच बऱ्याच गोष्टीने आपल्या साठी व आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात.क्रिकेट मुळे धावण्याची स्पीड वाढते. उडी मारल्याने शरीर लवचिक बनते.तसेच मानसिक क्षमतेचा विकास सुद्धा या क्रिकेट मुळे होत असतो.Maza Avadta Chand Essay in Marathi

आणखी हेही वाचा – Mazi Bharat Bhumi Nibandh in Marathi |माझा देश माझी भारतभूमी निबंध

हा खेळ खेळत असतात माझी जिंकण्याची खूप उसुकता असते. त्यासाठी आपल्यात धीर धरून आणि योग्य निर्णय कसे घ्यायचे असतात हे शिकायला मिळते. माझ्यासाठी जिकणे महत्वाचे नसून मला फक्त हा खेळ खेळत असतात आनंद घ्यायचा असतो. क्रिकेट खेळत असतांना बॉल चेंडू खूप आवश्यक असतो. त्यामुळे मी extra बॉल ची आधीच तयारी करून ठेवते. आणि प्रत्येक बारीकबारीक गोष्टीचे काळजीपूर्वक लक्ष देवून काम करते. जेव्हा आमचा क्रिकेटचा सामना चालू होतो तेव्हा फक्त खेळयाकडे लक्ष असते. ह्या खेळाने मला मानसिक बल, धैर्य, आणि आत्मविश्वास कसा टिकवून ठेवायचा असतो हे शिकवले आहे.

क्रिकेट मध्ये ८-१० खेळाडू असतात. हा खेळ खेळत असतांना एकत्र होऊन एक जुटीने खेळायचा असतो. तरच हा खेळ खेळतांनी दुसऱ्या टीमशी स्पर्धा करून शकतो. खेळातील प्रत्येक सदस्यांचे क्रिकेट खेळताना एक समान सहकार्य असते . त्यांना फक्त प्रेरणेची गरज असते. या खेळामुळे एक आणखी गोष्ट शिकायला मिळली जर आपण एकत्र येवून काम केले तर कोणतेही अशक्य असलेले काम शक्य होते. या खेळात एकमेंकाचा विश्वास एकमेंकावर असणे खूप गरजेचे असते. त्यामुळे मैत्री, विश्वास, आणि सामंजस्य या गुणांचा उत्तम विकास होतो.

मला क्रिकेट खेळत असतांना खूप काही शिकायला मिळाले. मला योग्य वेळी मार्गदर्शन देणारे मोठे व्यक्ति माझ्या सोबत कायम असतात. खेळ खेळतांना जिंकणे किंवा हरने हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे विजयाच्या क्षणी नम्र राहणे शिकलो आणि पराभवाच्या क्षणी धैर्य राखणे हे मी या माझ्या आवडत्या क्रिकेट खेळातून शिकलो आहे. क्रिकेटने मला कोणत्याही वेळेला आलेल्या संघर्षांना तोंड कसे द्यावे हे शिकवले आहे.

ह्या क्रिकेट कलेमुळे मी माझ्या शालेत झालेल्या क्रिकेट सामन्यात भाग घेऊ शकलो आणि त्यामुळे आम्ही जिकलो पण. हा माझ्यासाठी अत्यंत आठवणीचा क्षण आहे.मी आणि माझ्यासंघाने अतिशयछान पद्धतीने हा खेळ खेळ आनंद घेत खेळला. त्या विजयाचा आनंद आणि उत्साह आजही माझ्या मनात ताज्या आहे. तेव्हा पासून माझ्यात अधिक आत्मविश्वास वाढला आणि आम्ही सगळे मित्र आणखी उत्साहाने क्रिकेट खेळू लागलो. या खेळाणे माझ्या आयुष्यात अनेक रंग भरले. हा माझा छंद माझ्यासाठी खूप महत्वाचा भाग झाला आहे. या मुळे मला जीवनात बरेच चांगले वाईट प्रसंग अनुभवायला मिळाले आहे.

असा प्रकारे माझा आवडता छंद म्हणजे क्रिकेट. माझ्या साठी छंद म्हणूनच नाहीतर जीवनाचा एक भाग झाला आहे. क्रिकेट मुळे माझ्यात सकारात्मक बदल झाले. क्रिकेटने मला शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक दृष्टिकोनाने मजबूत केले. माझ्या मते, प्रत्येकाने आपल्या आवडत्या छंदाला वेळ दिला पाहिजे. जेणेकरून आपली आवड निवड ओळखता येईल आणि आपल्या मनाप्रमाणे जगत येईल अनुभव घेत येईल,कारण छंद हा असा भाग आहे जो जीवनात आनंद, समाधान, आणि आत्मविकासाचा मार्ग दाखवत असतो. माझ्यासाठी क्रिकेट हा एक असा छंद आहे ज्यामुळे माझ्या जीवनात नवीन रंग आणि अर्थ आले आहेत. मला प्रेरणा मिळाली मला जगण्याचे धडे शिकायला मिळाले ह्या खेळतूनच.

तर आजच्या लेखात आपण माझा आवडता छंद निबंध मराठी (Maza Avadta Chand Essay in Marathi) तर माझा आवडता छंद क्रिकेट या विषयी निबंध लेखन केलेले आहे. आपली आवड आणि निवड प्रत्येकाने जोपासायला पाहिजे. प्रत्येका मध्ये एक कला असते. ती ओळखुन आपण त्या कलेचा उपयोग करायला पाहिजे. आज आपण ह्या निबंधात माझा आवडता छंद या निबंधात क्रिकेट या निषयी निबंध लिहलेला आहे. हा आवडता खेळ असून या खेळातून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. तुम्ही पण तुमची आवड शोधा आणि बगा तुम्हाला खूप आनंद होईल. एक चांगली ऊर्जा मिळेल, प्रेरणा मिळेल आहे.

जर तुमचाही माझा आवडता छंद क्रिकेट असेल तर हा माझा आवडता छंद निबंध मराठी (Maza Avadta Chand Essay in Marathi) निबंध तुम्ही नक्कीच वाचा. आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैंत्रीणा पाठवा. तसेच तुमच्या शालेय जीवनात हा निबंध लिहिताना हा निबंधलेख नक्कीच उपयोगी पडेल.

अश्याच छान छान निबंध लेखनासाठी आमच्या lekhmarathi.com या वेबसाइट ला भेट द्या….

आणखी हेही वाचा– Mazi Aai Nibandh Marathi | माझी आई निबंध मराठी 300 शब्द

आणखी हेही वाचा –Mazi Shala Nibandh in Marathi | माझी शाळा निबंध

आणखी हेही वाचा –Chatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज निबंध

आणखी हेही वाचा – मराठी निबंध पावसाळा | Pavsala Nibandh in Marathi Essay

आणखी हेही वाचा –Mazi Bharat Bhumi Nibandh in Marathi |माझा देश माझी भारतभूमी निबंध

Sharing Is Caring:

Leave a Comment