Mazi Bharat Bhumi Nibandh in Marathi – आज माझी भारत भूमी या विषयी निबंध लिहणार आहोत. आपली भारत माता खूप महान आहे आजच्या निबंधात भारत देशाची विविधता, सांस्कृतीक आणि पारंपरिक वैशिष्ठे,भाषा ,ज्ञान,अध्यात्म, धर्म यांना खूप मोठा वारसा मिळाला आहे. भारत देश हा प्राचीन इतिहासिक गोष्टीने खूप प्रसिद्ध आहे. या भारत भूमीला संताची भूमी असे म्हटले जाते. या पावन भूमीवर संताचे जन्म झाले त्यांच्या मुळे संप्रदायिकता अजूनही टिकून आहे. अश्या या सुंदर भारत भूमी विषयी आज ह्या निबंधलेखनात खास उल्लेख करणार आहोत. तर चला मिंत्रानो,माझी भारत भूमी या विषयी निबंध विषयी लिहू या..
Mazi Bharat Bhumi Nibandh in Marathi | भारतभूमी निबंध मराठी
माझी प्रिय भारतभूमी.. भारत देश
भारत हा एक महान देश आहे, मी ह्या भारत भूमीचा रहिवासी आहे, माझी मातृभूमि भारत माता आहे. माझे माझ्या मातृभूमीवर खूप प्रेम आहे. माझी भारतभूमी संस्कृती, इतिहास आणि विविधतेने ह्या जगभरात प्रसिद्ध आहे. माझा भारत प्राचीन संस्कृतीमुळे खूप महान आहे. ही सुवर्णभूमीची सीमा उत्तर दिशेला हिमालय पर्वत तर दक्षिण भागाकडे भारतीय महासागराने बांधलेली आहे. भारत भूमीच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र व पूर्वेकडे बंगालची खाडी आहे. भारतीय इतिहासामध्ये साम्राज्ये, राजवंशीयाचा आणि पारंपरिक संस्कृतींचा मोठा साठा आहे. माझी सुंदर भारत भूमी विविध इतिहासिक आणि प्राचीनतेने नटलेली आहे, आणि तिच्या प्रत्येक काना कोपऱ्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि संस्मरणीय गोष्टी आढळतात.
माझा भारत देश हा आशिया खंडातील एक मुख्य देश आहे. आणि भारताची इतिहासिक संस्कृती अतिशय समृद्ध आणि विविधतेपैकी एक आहे. जगातून माझ्या भारताचे क्षेत्रफळ (३२,८७,२६५ ) ७ व्या क्रमांकावर आहे. आणि लोकसंख्येच्या द्रुटीने (१,३५,२६४,२२,८०) दुसऱ्या क्रमांकावर आहे. माझ्या भारतभूमी अनेक समाजातील धर्म, भाषा, नृत्य, संगीत, कला, साहित्य, वास्तुकला, आणि खाद्यसंस्कृती आहे त्यामुळे माझ्या भारत देशाने या जगाला खूप मोठा वारसा दिलेला आहे. आणि विविध समाजातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारसी धर्मीय लोक आमच्या भारतात राहतात.
त्यासोबतच वेगवेगळ्या भाषांचा ही बोलल्या जातात आणि शिकविल्या जातात, जसे की हिंदी, मराठी,इंग्लिश, आसामी ,कोकणी,मल्याळम,सिंधी, तमिळ,तेलुगु, कन्नड,गुजराती,पंजाबी आणि बंगाली. या सर्व संस्कृतींक गोष्टीमुळे माझ्या भारत भूमी ला मनाचे स्थान मिळाले आहे.आणि माझा देश जग प्रसिद्ध आहे. माझ्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ स्वतंत्र मिळाले आहे. भारत देशाचे राष्ट्रीय चलन भारतीय रुपया आहे.
माझ्या भारत देशातील सर्वात मोठे शहर मुंबई आहे. आणि भारताची राजधानी नवी दिल्ली आहे.माझ्या भारत देशाचे नैसर्गिक सौंदर्य विविध भौगोलिक स्थळांमुळे अधिक सुंदर आहे. उत्तर भारताकडे हिमालय पर्वतीय शिखरे आणि काश्मीरची सुंदरता या मुळे खूप सुंदर रूप मिळाले आहे. दक्षिणीकडे केरळ आणि गोव्याचे निसर्गरम्य सौंदर्य, आणि समुद्रकिनारा, तसेच तमिळनाडू मधील उच्च आणि भव्य मंदिरे. राजस्थान मधील वाळवंट, गुजरात मधील रण, आणि महाराष्ट्रातले सह्याद्री पर्वत आहेत. पूर्व भारत देशात आसाम, मेघालय, नागालँड आणि मिझोरामच्या हरित प्रदेशीय भागामुळे आकर्षक असा आपला देश आहे.
भारताचे अधिकृत राष्ट्रीय चिन्हे – राष्ट्रीय प्राणी वाघ आहे.राष्ट्रीय पक्षी मोर आहे. राष्ट्रीय वृक्ष वड,राष्ट्रीय फूल कमल, राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा डॉल्फिन आहे. राष्ट्रीय सरपटणारा प्राणी किंग कोब्रा, राष्ट्रीय परंपरागत प्राणी माकड, राष्ट्रीय फळ आंबा आहे. राष्ट्रीय नदी गंगा आहे. राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान आहे. प्राचीन शहरा आणि वास्तूपैकी काही शहरे आपल्या भारता त आजही प्रसिद्ध आहे, जसे की वाराणसी, मथुरा, हरिद्वार, अजंठा आणि एलोरा लेणी, खजुराहोचे मंदिर, आणि कोणार्कचे सूर्य मंदिरे आणि आग्रा मधील ताजमहल वास्तुकलेत आजही देखणीय आहे, दिल्लीचा लाल किल्ला,जयपूरचे हवा महल, मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया, आणि कोलकात्याचे व्हिक्टोरिया मेमोरियल हे देखील भारत देशाचे ऐतिहासिक प्रतीक आहेत.यांना भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक लोकांची गर्दी असते.
भारत देशाने शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात खूप मोठी प्रगती केली असून जगभरात ITI ,IIM,सारख्या मोठमोठ्या शिक्षणसंस्था भारतीय शैक्षणिक प्रतिष्ठेचे एक महत्वाचे प्रतीक आहेत. इसरोच्या चांद्रयान आणि मंगळयान मिशन्सनी भारताीय वैज्ञानिकानी केलेली प्रगतीची आजही साक्षी आहे.तसेच औषधनिर्मिती, आयटी, आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातही मोठी झेप घेतली भारताने घेतली आहे.Mazi Bharat Bhumi Nibandh in Marathi
माझ्या भारत देशात विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. म्हणून भारताला सणाचा देश म्हणून ओळखले जाते.. येथे दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी, दुर्गा पूजा, ईद, ख्रिसमस, पोंगल, बैसाखी, और बिहू असे अनेक सण भारताच्या सांस्कृतिक परंपरागत चालत येणाऱ्या सणाचे प्रतीक आहेत. या सणांमध्ये विविध प्रकारचे नृत्य, संगीत, खाद्यपदार्थ, आणि धार्मिक विधींचा समावेश असतो. सणांमुळे समाजात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते.
भारत देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णता कृषीवर अवलंबून आहे.भारता विविध हवामानामुळे त्या त्यात हंगामात विविध प्रकारची पिके घेत असतात. समान्यता गहू, तांदूळ, मका, कपाशी, उस, चहा, कॉफी, आणि मसाले हे भारतामध्ये प्रमुख पिके घेत असतात. भारताने कृषी क्षेत्रातही बरीच प्रगती केलेली आहे. भारत देशाने बऱ्याच संकटाना एकत्रित पणे मात दिलेली आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य संग्राम, महात्मा गांधींचे नेतृत्व, आणि भारतीय संविधानाने भारताच्या एकात्मतेची आणि लोकतांत्रिक मूल्यांची साक्ष आहे. भारताच्या एकत्रितपणा मुळे हा भारत देश त्यातील एकत्र आहे.
“माझी भारतभूमी” म्हणजे माझा भारत देश , माझी पारंपरिक संस्कृती, माझा वारसा, माझी ओळख आहे माझा महान भारत देश . . भारतीय संस्कृतीमुळे आणि समाजातील विविध पैलूमुळे भारताचा गौरव केला जातो. अशी या माझ्या महान भारत देशाची खऱ्या अर्थाने ओळख आहे.
तर आजच्या लेखात आपण माझी भारत भूमी मराठी निबंध( Mazi Bharat Bhumi Nibandh in Marathi )या विषयी हा निबंध लेखन केलेले आहे. माझ्या या भारत देशाची प्राचीन इतिहासिक प्रसिद्धी आजही साऱ्या जगात प्रसिद्ध आहे. असा हा माझा सुंदर भारत देश आहे. हा निबंध तुम्ही नक्कीच वाचा आणि आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रीणा पाठवा. तसेच तुमच्या शालेय जीवनात हा निबंध लिहिताना हा लेख नक्कीच उपयोगी पडेल.
अश्याच छान छान निबंध लेखनासाठी आमच्या lekhmarathi.com या वेबसाइट ला भेट द्या….
आणखी हेही वाचा– Mazi Aai Nibandh Marathi | माझी आई निबंध मराठी 300 शब्द
आणखी हेही वाचा –Mazi Shala Nibandh in Marathi | माझी शाळा निबंध
आणखी हेही वाचा –Chatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज निबंध
आणखी हेही वाचा – मराठी निबंध पावसाळा | Pavsala Nibandh in Marathi Essay