250+ Best Life quotes in Marathi | Short life quotes | जीवनावरील सुंदर विचार

Life quotes in Marathi -प्रत्येक दिवस हा प्रत्येकांच्या आयुष्यात सूर्यप्रकाशाच्या किरणांप्रमाणे काहीतरी चांगल करणाची संधी देत असते त्या संधी सोने कसे करावे ते त्याच त्याने ठरवायचं असत. कारण संधी एकदाच मिळत असते. तुम्ही ठरवा की तुम्हाला आनंदी जीवन जगायच आहे की दु:खी . आयुष्यात चढ-उतार हे येतच राहतात  अशावेळी आपल्याला कोट्सचा  Life Quotes On Marathi चा आधार घेत स्वतःला प्रेरणा देत आपल्याला पुढे  जायला  मदत करतात.  आयुष्यावरील असे हे कोट्स रोज  तुम्हाला आयुष्य जगायला अधिक प्रेरणा देताना दिसतात. बऱ्याचं वेळा आपण जीवनावर आधारित स्टेटस ठेवण्यासाठी यांचा वापर करत असतो. असेच काही उत्तम आणि जगायला प्रेरणा देणारे आयुष्यावरील कोट्स आणि स्टेटस (जीवनातले चांगले सुविचार )

Short Life Quotes In Marathi | जीवनावर आधारित चांगले सुविचार

“आयुष्यात तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा  कारण की आपण नसल्यावर  सर्वात जास्त फरक कोणाला पडतो,बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका.”

“हो खरंच आपण एकमेव असं असतो आपल्यासारखं फक्त आणि फक्त आपणच असू शकतो. आपण स्वत:ला जपायला हवं. कारण आपण खूप जास्त महत्वांच असतो, जर दुसऱ्याच विचार केला तर वाट आपली लागते.”

“कोणी अचानक बदलत नसत  आणि  असच सोडून जात नसत, त्याची सुरुवात खूप आधी पासून झालेली असते. आणि तसे सिग्नल  पण ते देतात.  पण ते आपल्याला कळत नाही जरी ते समजले तरी आपण त्याला  दुर्लक्ष करत असतो कारण आपला विश्वास असतो त्यांचा वर पण,  जेव्हा ते अचानक धक्का पोहचवतात तेव्हा कळत की  ते  सगळ प्लॅनिंग करून होत.”

“तुमच्या घाबरलेल्या  डिप्रेस झालेल्या आणि Overthinking करणाऱ्या मनाला अस वाटत की माझी वाट लागणार आहे . तुमच काही खर नाही. तर त्या मनाला बिंदास्त सांगा  की मला  माझ्या कर्मावर विश्वास आहे . मी  कोणाच वाईट केल नाही  किंवा कोणा बद्दल वाईट विचार केला नाही, तर माझ सगळ चांगल होईल याची मला चांगलीच खात्री आहे.” 

“घराबाहेर पडल्या शिवाय माणसाला कोणत्याच गोष्टीची किंमत कळत नसते. एकदा घराबाहेर जावून पहावं  खर आयुष्य काय असते समजून जाईल.”

“जेव्हा एखादा माणूस  बदलायला लागतो तेव्हा त्याला सपोर्ट करायला शिका. त्यांच्या चुका काढत बसू नका.  Accept करा आणि की माणसात चांगले बद्दल होऊ शकतात.  “

“जीवनाच्या चित्रपटात, आपले स्वप्न प्रेमाच्या रंगांनी भरून टाका . प्रत्येक चुनौतीला संधी म्हणून घ्या, आणि प्रेमाची दिशा नक्की जगा. आपली ध्येय पूर्ण करा .”

“काहीतरी कारण असेलच जो व्यक्ति आपल्या बरोबर  रोज इतक बोलायच की त्या बोलन्याला स्टॉप नसायचा पण आज अचानक  बोलनच बंद करून टाकल.प्रत्येक वेळी असच का होत. मनात आल तेव्हा बोलायच आणि मनात नसेल तर बोलण बंद करायच.”

“तुम्ही जसे आहे तसेच रहा कोणासाठी वाईट कीवा चांगले म्हणून स्वत:ला बदलवू  नका. कारण तुम्ही जसे आहे तसे  जर कोणाला आवडत असेल तर ते तुम्हाला स्वीकारतील आणि ज्याना आवडणार नाही  ते सोडून देतील.. लोकांचा जास्त विचार करत जाऊ नका.”

“जीवनात नेहमी एक गोष्ट लक्ष्यात ठेवा  रागात घेतलेले  निर्णय ही कधीही आयुष्य बरबाद करून टाकतं.”

Life Massage in Marathi | जीवनावरील मॅसेज मराठीत

“”कोणतेही नाते घट्ट टिकवून ठेवायचे असेल तर  भेटून  बोलण खूप महत्वाच असतं. दुरून ऑनलाइन बोलण्याने जास्त गैरसमज वाढतात. त्या साठि नेहमी लक्षात ठेवा वेळ भेटला तर भेटून बोला भावना समजेल.

“आयुष्यात कधीही पर्याय म्हणून उपथिति राहू नका.लोकांची गरज बना. लोक तुमच्या मागे मागे धावतील.”

“पक्षांना जस  पीजऱ्याच्या बाहेर उंच उडायला आवडत  तसच  आपल्या आयुष्यातील लोकाना सुद्धा  आझाद करून टाकायच. आणि मग तुम्हांला उंच उडायला सोपे जाईल.”

“धारदार शब्दाने मनात झालेली जखम  ही कोणत्या मलम किंवा पट्टीने कमी होत नाही ,तर त्याला आपल्या माणसाची साथ आणि आधारची गरज असते.”

“जबरदस्तीने आपल्या आयुष्यात कोणाला आणू नका. कारण योग्य वेळ ही त्या व्यक्तीला आपल्या  आयुष्यात आणतात.”

“ज्याच्या मध्ये सर्वात जास्त जीव अडकून बसतो तोच शेवटी आपल्या आयुष्यातून कायमच  दूर निघून जात असतो.”

“जशी जुन्या वस्तूंची आपल्या घरात किंमत नसते व कमी होते, तशीच प्रत्येक माणसाची किंमत  आपल्या आयुष्यात कमी होत  असते.”

“कष्ट करत असताना मानसाचं  शरीर थकतच पण त्याच बरोबर  डोक्यात चालत असलेल्या विचारांनी  सुध्या माणसाचं  मन थकत असते.”

Marathi Suvichar On Life In Marathi | जीवनावर आधारित मराठी सुविचार

” प्रत्येकाच्या  जीवनात बदल होतील  थोडा धीर धरा .काहींचे दिवस लवकर बदलतील  तर काहीचे मन बदलून जातील.”

“जीवनाच्या वाटेवर स्वत:च्या  भरोश्यावर जगा  दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. स्वत: अनुभव घ्या. कधीच मन दुखणार नाही.”

“एकाच एकाच गोष्टीचा जास्त विचार करत बसू नका. आयुष्य खूप सुंदर आहे  त्यासाठी आपले विचार आणि प्रयत्न  कायम चालू ठेवा.”

Life quotes in Marathi

“माणसाची परिथिति त्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवत असते. तो मग कठीण असो वा सोपा  सगळे जण आप आपल्या परीने जीवन जगतात.” Life quotes in Marathi

“जीवनाच्या वाटेत  भेटलेले  लोक असे काही बोलून जातात,की त्यांचे घाव आपल्या मनात  जागा करून बसतात.पण  त्यांना कुठे माहीत की  एकणाऱ्याच्या मनावर त्याचा किती मोठा परिणाम होईल.”

“जीवनात जर सगळी सुखे मिळाली पण त्याचा आनंद घ्यायला  आपल्यापाशी  आपल्या जवळचं  माणूस नसेल तर  त्या सुखाचा काय फायदा नाही.”

“ही पूर्ण जग गरजेच्या  आधारावर चालत असतं थंडीत सूर्याची वाट पाहली जाते तर उन्हाळयात त्याच सूर्याचा तिरस्कार  करतात.”

Life Status in Marathi | जीवनावर मराठी स्टेटस

“ज्याच दुख त्याला च  समजत  कारण त्रास काय असतो हे  फक्त आणि फक्त  सहन करणाऱ्या  मानसाला समजत असत.”

“आयुष्यात प्रत्येक माणसांची कदर करायला शिका. कारण जीवनाच सत्य हेच आहे की हसता  हसता हसता  आणि खेळता खेळता  माणूस कधी काही क्षणात नाहीसा  होतो  हे  सुध्या काळत नाही.”

“आपण कमवलेली वस्तु लाख रुपयाची असो नाहीतर एक रुपयाची ती  फक्त आपल्या  कष्टाच्या मेहनती ची असूद्या.”

“खोटी शपथ घालून मानस मरत नसतात ,मरतो  तो त्याच्यांमधील विश्वास आणि नातं .”

“प्रत्येकाने लक्षात ठेवा आपण  दुसऱ्यांना  दिलेला त्रास  कधी तरी  आपल्याला सुद्धा दुप्पट  पटीने सहन करावा लागू शकतो. म्हणून प्रत्येकाने  चांगलेच वागले पाहिजे.”

“आयुष्यात एखादयाची मदत नाही केली तरी चालेल. पण कधीही त्या व्यक्तीला टोचून बोलू नका कारण  मानस वाईट नसतात त्याला त्याची परिरथिति  सहन कारवी लागते.”

“आयुष्यात  कधी कधी अस  वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो. कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं  पूर्ण करता करता  आयुष्य निघून जात यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता.”

“जगतांना वाटेवरच्या  दुसऱ्यांचे ओझे  उतरवण्यासाठी  जेव्हा तुम्ही  स्वत: पुढे होता  ना , तेव्हा तुमचे ओझे पूर्वी पेक्षा  खूप हलके होते.”

Best Life Status in Marathi | जीवनावर आधारित मराठी स्टेटस

“जशी वेळ कोणासाठी थांबत नाही तसच आयुष्य ही  कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची  कारणे  बदलत असतात. त्यासाठी प्रत्येकाने पुढे पुढे चालत राहायच असते.”

“आयुष्यात  अशी खूप कमी लोक आहेत जे आपल्यासाठी  सुख आणि आशीर्वाद घेवून येतात…आणि अशी पण लोक आहेत जे  आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यास येत असतात.”

“आयुष्यात काहीतरी  करायचे असेल तर आपण काय आहोत आणि  यापेक्षा आपण  अधिक काय होऊ शकतो याचा विचार  नक्की करायला हवा,  या जगात अशक्य अस काहीच नाही.मेहनत करा. यश नक्कीच मिळेल.”

“आपण  घेतलेले कोणतेच निर्णय हे  कधीच चुकीचे  नसतात . फक्त तो घेतलेला निर्णय  बरोबर आहे हे सिध्द करण्याची जिद्द आपल्यात असायला पाहिजे. अशक्य हे काहीच नसते.”

“जीवना मध्ये  आपल्याला  जे  हव होत ते कधीच  मिळू शकले नाही,  तर  त्याबाबत  नाराज  राहून  बसून नका त्या ऐवजी, जे काही  मिळाले आहे त्या बद्दल  आभारी आहे अस  समजा आणि ठरवा की हे  .जग अधिक चांगले व सुंदर बनविण्यासाठी  हातभार लावण्याची संधी मला जेव्हा  कधीही  मिळेल, तेव्हा  तेव्हा  ती संधी मी गमावनार  नाही.”

“आयुष्यात स्वत:ला  इंटरेस्ट घ्यावा लागतो तरच त्या  सर्व गोष्टींचा आनंद अनुभवायला मिळतो. नाहीतरी या जगात  एकही नवीन गोष्ट अनुभवता येत नाही.”

“एखाद्याला न मागत काहीतरी देऊन पहाव त्यांच्या चेहऱ्या वरील ते गोड हसणं पाहुंणच  आपल्या साठी  खूप मोलाच आणि सुख देणार असत.”

“एखाद्याला जास्त जीव लावू नका अति जीव लावल्याने कोणीतरी एक जण  हा चुकीचा ठरू शकतो. त्यांची सहन शक्तिपहुंच कोणतेही काम करावे.”

तर आजचा विषय  life quotes in Marathi या लेखामध्ये आम्ही  जीवनातील काही मोलाचे अनुभव व्यक्त केले आहे . जेव्हा आपल्याला  मार्ग सापडत नाही. त्या वेळेस आपल्याला शांत बसून विचार करवा लागतो. तरच काही ना काही  मार्ग मिळत असतो. फक्त आपल्याला योग्य त्या वेळेस  त्याची ओळख झाली पाहिजे. त्याचसाठी  हे सगळे लाइफ कोट्स इन मराठी विचार तुम्हाला  समजायला मदत करतील व  तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायला देखील प्रोत्साहन सुद्धा देतील.आणखी बरेच काही जीवनावर आधारित life status in Marathi ,life quotes, suvichar On Life In Marathi  खास तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. 

अश्याच विशेष प्रेरणादायी विचार,मॅसेज ,स्टेटस, कोंट्स आणि शुभेच्छा साठी आमच्या lekhmarathi.com वेबसाइट ला भेट द्या…

आणखी हेही वाचा – Best [100+] Motivational Quotes in Marathi For Success | सक्सेस कोट्स मराठीत

आणखी हेही वाचा- Best [99+] Good Thought in Marathi | सकारात्मक सुविचार संग्रह

आणखी हेही वाचा – 100+ Emotional Heart Touching Love Quotes in Marathi

Sharing Is Caring:

Leave a Comment