Fixed deposit information in Marathi | बँकिंग मुदत ठेव म्हणजे काय ?

Fixed deposit information in Marathi – आजच्या लेखात आपण बँकिंग क्षेत्रातील मुदत ठेव म्हणजे काय ? या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपले भविष्य सुरक्षित व्हावे या साठी रोज प्रत्येक त्याच्या पद्धतीने धावपळ करत असतात. पुढील आयुष्य सुखात जावे या साठी ते दिवस रात्र कष्ट करत असतात. आणि तेच पैसे साठवून ठेवण्यासाठी खूप महत्वाचे असते, कारण पैसा ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकासाठी दैनंदिन जीवनासाठी खूप आवश्यक आणि उपयोगी पडत असते. आजकाल पैसे गुणंतुवणुकीचे बरेच पर्याय आपल्या मिळून जाईल. पण आधी असे काही पर्याय नव्हते. त्यामुळे खूप समस्यांना समोर जावे जागायचे पण आता एक एक उत्तम पर्याय FD म्हणजे फिक्स्ड डिपाजिट(Fixed deposit) हा आपल्याकडे आहे. तर आज आपण फिक्स्ड डिपाजिट Fixed deposit information in Marathi जाणून घेऊया सर्व माहिती.

Fixed Deposit Information In Marathi | फिक्स डिपॉझिट म्हणजे काय ?

Fixed deposit information in Marathi
Fixed deposit information in Marathi – Example

FD चा फूल फॉर्म – ( फिक्स डिपॉझिट) ‘Fixed deposit’ मराठी मध्ये मुदत ठेवी असे म्हटले जाते.

फिक्स डिपॉझिट म्हणजे गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे त्यामध्ये आपण विशिष्ट कालावधीसाठी निश्चित रक्कम जमा करू शकतो. त्त्या रकमेसाठी आपल्याला ठराविक व्याजदर सुद्धा मिळत असते. ही रक्कम मुदत संपल्या नतर काढता येते किवा परत दुसऱ्या मुदतीसाठी बँकेत जमा ठेवू शकतो. परंतू ही रक्कम मुदतीच्या आधी काढू शकत नाही.

पूर्वी लोक पैसे घरातच ठेवत असायचे कारण तेव्हा बँक होत्या आणि त्यामुळे घरात जेवढे रक्क म असते तेवढीच राहायची ती वाढत पण नव्हती आणि कमी पण होत नव्हती त्यामुळे घरात असलेली रकमेची नेहमी काळजी असायची.
परंतु आता तसे नाही आता जग पुढे गेले आहेत आता भरपूर बँका झाल्या आहेत त्यामुळे आपली जमाकुंची आपण बँकेत ठेवू शकतो. त्यामुळे काळजी करण्याची काही चिंता नसते. आणि आपण जमा केलेले पैसे वर आपल्याला व्याज सुद्धा मिळत असते.
तसेच आपल्याला हवे तेव्हा आपण ते पैसे काढू शकतो.

मुदत ठेवीचे प्रकार | Types OF Fixed Deposit

1.नियमित फिक्स्ड डिपॉझिट (Regular Fixed Deposit)
नियमित फिक्स्ड डिपॉझिट मध्ये 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत चा कालावधी असतो.
हा एक सर्वसाधारण FD चा प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्ही ठराविक कालावधीसाठी रक्कम ठेवता आणि त्या रकमेवर तुम्हाला निश्चित व्याजदर मिळतो. हा फिक्स्ड डिपॉझिट सर्व सामान्य लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, कंपन्यांसाठी. उपयोगी पडतो.

2. वरिष्ठ नागरिक फिक्स्ड डिपॉझिट (Senior Citizen Fixed Deposit)
वरिष्ठ नागरिक फिक्स्ड डिपॉझिट मध्ये 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत चा कालावधी असतो.
हा एक उत्तम ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याजदर मिळणारा FD आहे . यामुळे त्यांना नियमित FD पेक्षा जास्त परतावा मिळत असतो. हा FD 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी आहे.

3. रेकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit)
रेकरिंग डिपॉझिट चा कालावधी हा 6 महिन्यांपासून 10 वर्षांपर्यंत आहे.
या मध्ये नियमित आधारावर ठराविक रक्कम जमा करायची असते, आणि मुदत ठेवीप्रमाणेच व्याज मिळते. ज्यांना एकाच वेळी मोठी रक्कम ठेवता येत नाही त्यांच्यासाठी उपयुक्त.

4.फ्लेक्सी फिक्स्ड डिपॉझिट (Flexi Fixed Deposit)
वैशिष्ट्ये: या FD मध्ये तुमची मुदत ठेव बचत खात्यासोबत लिंक केली जाते. जर तुमच्या बचत खात्यातील बॅलन्स ठराविक मर्यादेच्या खाली गेला, तर ते पैसे मुदत ठेवीतून ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होतात.
फायदे: बचत खात्यातील पैसे सुलभतेने उपलब्ध राहतात आणि उर्वरित रक्कम मुदत ठेवीतून जास्त व्याज मिळवते.

5. NRI (Non-Resident Indian) फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे

परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध असलेली एक विशेष गुंतवणूक योजना. एनआरआयंसाठी विविध प्रकारच्या फिक्स्ड डिपॉझिट योजना उपलब्ध आहेत, ज्या त्यांच्या आर्थिक गरजांनुसार निवडता येतात.

मासिक व्याज मुदत ठेव – मासिक व्याज मुदत ठेव ठेवले तर आपल्याला दर महिन्याला व्याज मिळते परंतु ही रक्कम वार्षिक व्याज मिळणाऱ्या रकमेपेक्षा कमी असते. उदाहरणार्थ दहा हजार १०००० रुपयांवर ९० % दराने दरवर्षी १००० मिळू शकतात परंतु हीच रक्कम ९०% मासिक व्याज वर ठेवली तर 88.33 रुपये मिळेल म्हणजेच ही रक्कम दरमहा पेक्षा कमी असते.

    त्रिमसिक मुदतीची मुदत ठेव – त्यामध्ये जर आपण पैसे ठेवले तर आपल्याला दर तीन महिन्यांनी व्याज मिळते पेन्शन धारकांमध्येही आवडती योजना आहे.

    पूर्णनीरवेश योजना – जर आपण त्री मासिक मुदतीची मुदत ठेवली तर आपल्याला तीन महिन्यांनी मिळणारी रक्कम परत त्रिमासिक मुदतीची मुदतीमध्ये ठेवली जाते म्हणून चक्र व्याज रक्कम आणि मुद्दल हे मुदतीच्या शेवटी मिळते.Fixed deposit information in Marathi

    Fixed Deposit मुदत ठेव कशी काम करते?

    • रक्कम ठेवणे: तुमच्या निवडलेल्या कालावधीसाठी बँकेत निश्चित रक्कम ठेवली जाते.
    • व्याजाची गणना: तुमच्या ठेवलेल्या रकमेवर ठराविक दराने व्याज मिळते, आणि ते साधारणतः कालावधीच्या शेवटी मिळते.
    • मॅच्युरिटी: जेव्हा मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण होतो, तेव्हा तुम्हाला तुमची मूळ रक्कम आणि व्याज मिळते.

    Benefits of Fixed Deposit | FD चे फायदे

    • फिक्स डिपॉझिट करण्याचा एक अतिशय सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे.
    • गुंतवणूक करणाऱ्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एबी खाते सुरू करण्याआधीच किती व्याजदर आहे मुदत संपल्यानंतर किती रक्कम मिळणार आहे पहिलेच माहिती असते.
    • गुंतवणूकदारांना जर रकमेची आवश्यकता असेल तर फिक्स डिपॉझिट मधून कर्ज घेऊ शकतो. फिक्स डिपॉझिट च्या रकमेच्या ९० टक्के पर्यंत तो कर्ज घेऊ शकतो.
    • विमा आणि क्रेडिट ट गॅरंटी कॉपोरेशन म्हणजेच डी आय सी जी सी अंतर्गत पाच लाख पर्यंत विमा संरक्षण मिळते. म्हणजेच जर बँक बंद झाली तरीही तुमची रक्कम सुरक्षित मिळते.
    • अनेक बँका जसे की एसबीआय आणि एसबीएम गुंतवणूकदारांना त्यांच्या एफडीवर क्रेडिट कार्ड ऑफर करते हे सुरक्षित क्रेडिट कार्ड असते त्यामुळे ग्राहकांना खूप फायदा होतो फिक्स डिपॉझिट च्या मदतीने ज्येष्ठ नागरिकांना 0.50 जास्तीचे व्याज दिले जाते.
    • उघडण्यासाठी कमीत कमी हजार रुपये लागतात तसेच कर बचत शंभर रुपयांनी सुरू करता येते.

    Fixed Deposit खाते कसे उघडायचे ?

    १ . तुमच्या नजीकच्या बँकेत जाऊन किंवा ऑनलाइनपद्धतीने घरूनच अर्ज करु शकता.

    २ . आवश्यक कागदपत्रे जमा करा (ओळखपत्र, पत्ता पुरावा, पासपोर्ट फोटो).

    ३ . FD रक्कम निवडा आणि ठराविक कालावधीसाठी जमा करा.

    ४. तुमच्या इच्छेनुसार व्याजदर निवडा, मासिक, तिमाही किंवा मॅच्युरिटीवर मिळणारा.

    Fixed Deposit मुख्य चे वैशिष्टे काय

    • सुरक्षितता: मुदत ठेव हे कमी जोखमीचे गुंतवणूक साधन आहे, कारण तुम्हाला ठराविक व्याजदरावर निश्चित रक्कम मिळते.
    • व्याजदर रक्कम : मुदत ठेवीवर तुम्हाला निश्चित व्याजदर मिळतो जो कालावधीच्या शेवटी मिळतो.
    • विविध कालावधी: मुदत ठेव विविध कालावधीसाठी उपलब्ध असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कालावधी निवडू शकता.
    • कर मुक्ती : काही विशेष प्रकारच्या मुदत ठेवींसाठी करसवलत मिळू शकते, उदा. 5 वर्षांच्या टॅक्स सेविंग FD मध्ये.

    तर अशाप्रकारे आपण (Fixed deposit information in Marathi- ) Fixed deposit चा फुल फॉर्म मराठी मध्ये जाणून घेतला आहे. Fixed deposit म्हणजे काय, Fixed deposit types , आणि Fixed deposit कसा काढला जातो टिप्स. अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण येथे पाहिली आहेत. Fixed deposit information असणे किती आवश्यक आहे हे चांगले समजले असेल. जर तुमच्या मित्र परिवारा पैकी कोणाला कीवा Fixed deposit काढायची असेल तर पण fd बद्दल माहिती नसेल तर हा लेख त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. जर तुम्हाला Fixed deposit information बद्दल अधिक प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये प्रश्न विचारू शकता.. आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.

    FAQs

    फिक्स्ड डिपॉझिटवर व्याज कसे मिळते?

    फिक्स्ड डिपॉझिटवर व्याज मासिक, तिमाही, अर्धवार्षिक, वार्षिक किंवा मॅच्युरिटीच्या शेवटी मिळू शकते. तुम्ही FD उघडताना ही पर्याय निवडू शकता.

    फिक्स्ड डिपॉझिट मोडता येते का?

    होय, फिक्स्ड डिपॉझिट मोडता येते. परंतु, मॅच्युरिटीपूर्वी FD मोडल्यास, काही अटी लागू होतात आणि काही व्याज कमी मिळू शकते.

    फिक्स्ड डिपॉझिटवर कर लागू होतो का?

    होय, फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणारे व्याज करपात्र असते. जर तुमच्या FD वरून मिळणारे व्याज ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर TDS (Tax Deducted at Source) देखील लागू होऊ शकतो.

    फिक्स्ड डिपॉझिटवर लोन घेता येते का?

    होय, तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटच्या आधारावर तुम्हाला कर्ज घेता येते. हे कर्ज FD च्या रकमेच्या 70-90% पर्यंत असू शकते आणि त्यावरील व्याजदर FD च्या व्याजदरापेक्षा थोडा जास्त असतो.

    किती काळासाठी फिक्स्ड डिपॉझिट ठेवता येते?

    फिक्स्ड डिपॉझिटचा कालावधी 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत असू शकतो. तुम्ही तुमच्या गरजेनुसार FD चा कालावधी निवडू शकता.

    Sharing Is Caring: