Vat Purnima Information In Marathi | वट पौर्णिमा सण 2024 संपूर्ण माहिती

Vat Purnima Information In Marathi – दरवर्षी येणारा वटपौर्णिमा हा सण या वर्षी कधी आहे कोणता शुभ मुहूर्त आहे व ह्या व्रताच्या पूजेचे काय महत्त्व आहे ते आपण पाहणार आहोत. ज्येष्ठ महिन्यात येणारी पहिली पौर्णिमा हा दिवस आपल्या हिदू धर्मात “वटपौर्णिमा” म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी प्रत्येक स्त्रिया आणि नवविवाहित स्त्रिया वटसंवित्रीच्या चे व्रत करत असतात. असे मानले जाते की ह्या व्रत केल्याने त्यांच्या जीवनसाथीदाराला उत्तम आरोग्य मिळते , त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हावं आणि तिला अखंड सौभाग्य लाभाव म्हणून वडाच्या झाडाची पूजा आणि व्रत मोठ्या श्रद्धेने स्त्रिया करत असतात.

वट पौर्णिमेच्या दिवशी सर्व स्त्रियानी जर वडाची पूजा केली तर अखंड सौभाग्य लाभते असे म्हटले जाते आणि जीवनात सुख शांती व धनसंपत्ती प्राप्त होण्यास मदत होते. त्यामुळे या दिवशी खास करून श्रद्धेने विवाहित स्त्रिया वट पौर्णिमेचा व्रत ठेवून विधिनुसार पूजा करतात त्यामुळे त्यांना समाधान मिळतेच सोबतच व्रत केल्याचे शुभ फळ पण मिळते. असे म्हणतात की जसे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते तसेच आपल्या पतीचे आयुष्याला दीर्घायुष्य असावे, अशी हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची महत्वपूर्ण धारणा असते.

Vat Purnima Information In Marathi | वट पौर्णिमा पुजा माहिती | Vat Purnima Pooja 2024 in Maharashtra

वट पौर्णिमेचे दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाते. म्हणून यंदा आपल्या महाराष्ट्रात वटपौर्णिमा व्रत २०२४ पूजेची शुभ वेळ, ज्येष्ठ पौर्णिमा २१ जून २०२४ रोजी सकाळी ०७ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होनार आहे. तर २२ जून रोजी सकाळी ०६ वाजून ३७ मिनिटांनी समाप्त पण होणार . , म्हणून सर्वानी २१ जून २०२४ रोजी वट सावित्री पौर्णिमा लक्षात ठेवून शुभ मुहूर्तावर आपली पूजा विधी पूर्ण करून घ्यावी म्हणजेच व्रत केल्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. सकाळीच पहाटे या दिवशी पूजेची वेळ सकाळी ०५ वाजून २४ मिनिटे आहे तर ते १० वाजून ३८ मिनिटांपर्यंत आहे.

शुभ मुहूर्त (Vat Purnima Pooja 2024)

२१ जून रोजी सकाळी ७.३१ वाजता. – पौर्णिमा सुरू होते
२२ जून संध्याकाळी ०५.३७ वाजता. – पौर्णिमा समाप्ती होते
वटपौर्णिमा व्रताची तारीख – २१ जून २०२४, शुक्रवार आहे

वट सावित्री व्रत का साजरा केले जाते 2024 ? | Vat Purnima Pooja Mahiti.

Vat Purnima Information In Marathi

हिंदू पौराणिक कथेनुसार या व्रताचे विशेष महत्व आहे आणि या व्रतामुळे माता सावित्रीने तिच्या पतीसाठी म्हणजेच सत्यवाना साठी यमराजांकडून लडून सर्व संकटाना मात करून तिने तिच्या पतीला जीवदान देण्यास यमराजांना भाग पाडले होते. त्यामुळे सर्व महिला मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने दर प्रत्येक वर्षी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या सुखी आणि निरोगी आरोग्यासाठी आणि अखंड दीर्घायुष्यासाठी वट सावित्री व्रत पत्नी मनाभावाणे करत असतात.


वट पौर्णिमा हा सण जगभरात म्हणजेच परकीय देशात राहत असलेल्या आपले हिंदू धर्माचे लोक आपल्या धर्माचे पालन करत हिंदूंद्वारे स्मरण करत असतात. वट पौर्णिमा व्रत हिंदू पौराणिक कथेनुसार देवी गौरी आणि सती सावित्री यांना उदेशून समर्पित केलेली आहे. आणि वट पौर्णिमा अख्या महाराष्ट्रात तेसच गुजरात राज्यातही मोठ्या उत्साहात सर्व स्त्रिया मिळून साजरा करत असतात. इतर राज्यांत जसे की दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओरिसा मध्ये वट पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. तसेच भारतातील दक्षिणेकडील राज्यांत, या वट पौर्णिमा व्रताला ‘ करदैयन नॉनबु ‘ असे म्हटले जातात आणि म्हणतात. संपूर्ण भारतात वट पौर्णिमा व्रत पाळले जातात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्रीयांचे प्रतीक म्हणून ह्या सणाला मानले गेले आहे.

Vat Purnima Pooja Vidhi | वट सावित्री व्रत पूजा 2024 विधि

सामग्री – हळद-कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हण, पळी, भांडे, पाट, गंध-अक्षता, बुक्का, फुले, तुळशी, दूर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची पाने 12, कापसाची वस्त्रे, जानवे, सुपार्‍या 12, फळे, 2 नारळ, गूळ, खोबरे, बांगड्या, फणी, गळेसरी, पंचामृत (दूध, दही, तूप, मध, साखर), 5 खारका, 5 बदाम, सौभाग्यवायनाचे साहित्य- तांदूळ, 1 नारळ, 1 फळ, 1 सुपली, आरसा, फणी, हिरव्या बांगड्या 4, हळद, कुंकू-डब्या 2, सुटे पैसे.. सौभाग्यवायन देणे शक्य नसल्यास दक्षिणा द्यावी.


या शुभ दिवसावर,Vat Savitri Vrat 2024 स्त्रिया पहाटेच लवकर उठुण तीळ आणि आवळा (भारतीय गुसबेरी) पेस्ट लावून घेतात आणि मग आंघोळ करतात. त्यांतर ती आवश्यक शुशोबित दागिने आणि नवीन नवीन नववारी साडी नेसून सुंदर अशी आदर्श पत्नीसारखी तयार होते.धार्मिक मान्यतेनुसार महिलांसाठी दागिना घालणे खूप पवित्र मानले गेले आहे. या दिवशी सर्व स्त्रियांसाठी 16 प्रकारच्या शोभेच्या वस्तूंचा उल्लेख केला गेला आहे. जसे की सिंदूर लावणे, बांगड्या, कोहल, कपाळाला बिंदी, मेंदी गळयात मंगळसूत्र नवीन कपडे आणि बरेच काही यांचा समावेश केलेला आहे.


दिवसभर सर्व विवाहित बायका आपआपल्या पती साठी निळलंकाल कडक उपवास करतात.वडाच्या झाडाभोवती सर्व विवाहित महिला मोठ्या संख्येने जमा होतात त्या दिवशी त्या एकदम सुंदर दिसतात. पूजेच तट सजवून त्या वटवृक्षाची पूजा उत्साहाने करतात….Vat Savitri Vrat पूजा करत असताना मनात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत ती झाडाला पाणी ओततात आणि झाडाभोवती 108 वेळा पिवळा किंवा लाल धागा बांधतात.पाया पडून नमस्कार करतात.

केळी, आंबा, जॅकफ्रूट आणि लिंबू या फळांच्या स्वरूपात ओल्या डाळी आणि तांदूळ सोबत प्रसाद दिला जातो. आणि नंतर सर्व विधी पूर्ण करून, स्त्रिया आपल्या पतीच्या आणि कुटुंबातील इतर ज्येष्ठांकडून आशीर्वाद घेतात. काहीजण पुण्याचे काम म्हणून ह्या दिवशी वट व्रताच्या निमित्ताने गरजूंना कपडे, अन्नदान आणि पैसे वाटप करणे हे देखील पुण्यदायी काम करतात. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोनविण्यात येतो तेव्हा विशेष स्वादिष्ट पदार्थ बनवतात आणि कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांसह खाल्ले जातात.

वट वृक्षाची पूजा का केली जाते (vat vruksh pooja mahiti )

निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ या वृक्षांची पूजा करण्याची कल्पना आपल्या भारतीय संस्कृतीने स्वीकारली असून तिला खूप काळापासून तिला आजही सगळेजण जपत आहे. अश्या विशिष्ट जातीच्या वृक्षाला एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही आणि कोणीही तोडण्याचा विचार करत नाही. स्त्रीया वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात. कारण ह्या वृक्षाचे पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने विशेष महत्त्व दिलेले आहे. म्हणूनच त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा या पूजेचा एक महवतपूर्ण हेतू आहे.

वट पौर्णिमा कथा माहिती (Vat Savitri Vrat 2024 Katha)

या व्रतामागे एक पारंपरिक रित्या महत्व आहे. सावित्री आणि सत्यवान या पती पत्नीची ही कथा सांगितली आहे. खूप काळापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची एक सुंदर कन्या होती. सावित्री अतिशय देखणी, सभ्य आणि गुणी मुलगी होती. सावित्री मोठी झाल्यावर राजाने म्हणजे तिच्या वडीलांनीच तिला तिच्या मनाचा पती निवडण्याची परवानगी दिली. Vat Purnima Information In Marathi

तर मग सावित्रीने एक सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. एका मोठ्या हल्यात शत्रूकडून त्यांच्या वर प्रहार झाला त्यामुळे त्यांनी राज्य आणि राजमहाल सोडून आपल्या राणी व राजकुमार सत्यवान यांना घेऊन राजा धृमत्सेन जंगलात राहणयास गेले. कलातरांणे भगवान नारदाला समजले की सत्यवान राजकुमाराचे आयुष्य फक्त एक वर्षाचेच आहे त्यामुळे नारदाणे राजकुमारी सावित्री यास लग्न न करण्यास समजावून सांगितले होते. तरीही सावित्रीने या गोष्टीला मान्य केले नव्हते. आणि तिने सत्यवानाशी विवाह केला. विवाहानंतर ती नवऱ्यासोबतच जंगलात येऊन सासू सासऱ्याची सेवा करू लागली.काही दिवसानंतर तिला समजले की आता सत्यवानाचा मृत्यू तीन दिवसावर येऊन पडला आहे. तेव्हा तिने तीन दिवस कडक उपवास करून सावित्री व्रताचा आरंभ केला होता.Vat Purnima Information In Marathi


एकी दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्याला निघाला होता सोबतच सावित्रीपण गेली होती. लाकडे तोडता असताना च ती त्याला घरी घेवून आली आणि क्षणांतच निपचित तो जमिनीवर पडला. यमदेव तिथे आले आणि सत्यवानाची प्राणज्योत घेवून निघाले. सावित्री ही यमादेवाच्या च्या मागे मागे आपल्या पतीबरोबर निघाली. यमदेवानेने बऱ्याच वेळा सावित्रीला घरी परत जायला सांगितले. परंतु तिने परत जाण्यास नकार दिला आणि पतीसोबतच जाण्याचा हट्ट केला.

शेवटी कंटाळून गेलेल्या यमदेवाने एक अट सुद्धा ठेवली ती अट अशी होती की पती सोडून दुसरे तीन वर मागू शकते. त्याला ही तिने साथ नकार दिला आणि सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व त्यांचे राज्य परत मागितले व तिला पुत्र व्हावा असा वर मागितला. आणि यमराजदेवाने न कळतपणे तथास्तु म्हणून दिले. लगेच त्याला समजले की आपण वचनबद्ध आहो आणि आता आपल्याला सत्यवानाचे प्राणज्योत ही परत कराविच लागेल.यमराजदेवाने अश्या प्रकारे संवित्रीच्या बोलण्यात येवून सत्यवानाचे प्राण सावित्रीला वडाच्या झाडाखालीच परत मिळवून घेतले. म्हणूनच ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत हा पाळतात.

तर आपण आज यंदा येणाऱ्या वटपौर्णिमा सण या विषयी वट सावित्री व्रताचे शुभ मुहूर्त पूजा विधी, का हा सण स्त्रिया साजरा करतात आणि वडाच्या झाडाचे महत्व या सर्व गोष्टी आणि पुजेची संपूर्ण माहिती आपण पाहली आहे.Vat Purnima Information In Marathi आपण ह्या लेखात दिलेली आहे. ही माहिती तुम्ही नक्कीच वाचावी.

Sharing Is Caring:

Leave a Comment