KYC Full Form In Marathi | केवायसी म्हणजे काय ? जाणून घ्या

KYC Full Form In Marathi – मित्रांनो आपण आजच्या लेखामध्ये केवायसी चा फुल फॉर्म काय आहे ? मराठी मध्ये केवायसी ला काय म्हणतात, केवायसी म्हणजे काय, केवायसी का करावी लागते, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असेल, आणि सध्याच्या परिस्थितीत केवायसी करणे किती आवश्यक आहे तुम्हाला चांगलेच माहीतच आहे, कोणत्याही बँकेने क्षेत्रात किंवा सरकारी क्षेत्रात केवायसी हा शब्द ऐकायला येते. तर आपण पाहणार आहोत केवायसी चा फुल फॉर्म काय आहे, आणि केवायसी चे महत्त्व त्याची गरज का असते. आणि ती केवायसी कशी केली जाते. याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

तर चला केवायसी बद्दल, केवायसी चा फुल फॉर्म, लॉन्ग फॉर्म, केवायसी म्हणजे काय, केवायसी चे प्रकार, केवायसी मुळे होणारे फायदे केवायसी न केल्यामुळे होणारे तोटे आपण येथे बघूया.

KYC Full Form In Marathi | केवायसी फूल फॉर्म इन मराठी

KYC Full Form – केवायसी फुल फॉर्म नो यु आर कस्टम (‘Know Your Customer‘) Full Form in Marathi असा होतो.

KYC Long Form – K-Know Y-Your C- Customer

केवायसी (Know Your Customer) – म्हणजे आपल्या ग्राहकांची ओळख आणि आपल्या ग्राहकाचा पत्ता यांचे पुरावे विषयी माहिती असणे.

केवायसी (KYC) म्हणजे काय ?

केवायसी (KYC) म्हणजे – तुमचा ग्राहक जाणून घेणे.

ही एक नियम प्रणाली आहे, जी प्रत्येक बँकांमध्ये, संस्थांमध्ये, आणि इतर सेवांसाठी ओळख करण्यास महत्त्वाची प्रक्रिया आहे.

केवायसी केल्याने ग्राहकाची ओळख पटते आणि त्याची महत्त्वाची माहिती गोळा केली जाते. केवायसी ही प्रक्रिया आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पारदर्शकता ठेवण्यासाठी खूप जास्त आवश्यक ठरते.

केवायसी करताना मुख्यतः ग्राहकांची माहिती गोळा केली जाते, त्यामध्ये ग्राहकाचे नाव, त्यांचा पत्ता, संपर्क तपशील, आणि जन्मतारीख, इत्यादी माहिती गोळा केली जाते. त्यामुळे बँकेला ग्राहकाची ओळख पडताळणी करण्यात मदत होते.

ई केवायसी (eKYC) म्हणजे काय

ई केवायसी (eKYC) म्हणजे इलेक्ट्रॉनिक केवायसी (‘Electronic Know Your Customer’)

या केवायसी प्रक्रियेमध्ये डिजिटल पद्धतीने ऑनलाइन ग्राहकाची ओळख पडताळणी केली जाते. त्यामुळे ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुरक्षित आहे या प्रक्रियेमध्ये ग्राहकाचा आधार क्रमांक वापरून ओटीपी(OTP) किंवा बायोमेट्रिक फिंगरप्रिंट च्या माध्यमातून ग्राहकाची खरी ओळख पटवून ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते.

ई केवायसी या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नसते, ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केली जाते.म्हणून या प्रक्रियेला इ केवायसी असे म्हणतात.

KYC प्रक्रिया कशी आहे

  1. ग्राहकाची ओळख व त्यांच्या पत्त्याची पडताळणी करण्यासाठी
  • केवायसी प्रक्रिया करताना ग्राहकांची ओळखपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, असे पुरावे गोळा करणे.

2. ग्राहक फसवणूक टाळण्यासाठी

  • केवायसी प्रक्रिया करणे खूप आवश्यक असते, कारण मनी लँडिंग, दहशतवादी फायनान्सिंग, आणि इतर गैर व्यवहार होऊ नये म्हणून केवायसी प्रक्रिया करणे अतिशय महत्त्वाचे ठरते, आणि गुण्यापासून वाचण्यासाठी संरक्षण होण्यासाठी मदत होते.

3.सरकारी नियम

  • सरकारी नियमांचे पालन करण्यास बँका, संस्था, तसेच इतर सेवाचा उपभोग घेण्यासाठी केवायसी असणे अनिवार्य केले आहे.

4.केवायसीचे सेवा

  • केवायसी मुळे अनेक सुविधा ग्राहकांना पुरवल्या जातात. जसे की नवीन खाते उघडणे, कर्ज मिळवणे, आणि इतर सेवांचा लाभ घेता येणे.

केवायसी (KYC) करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात

ओळख प्रमाणपत्र – केवायसी करण्यासाठी योग्य कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, अशी ओळख प्रमाणपत्र लागतात.

पत्ता पुरावा – विजेची बील,बँक स्टेटमेंट राशन कार्ड, कर पावती, इत्यादी.

फोटो – स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो.

फॉर्म भरणे – केवायसी फॉर्म (KYC) बँकेत जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागतो त्यामध्ये तुमचे नाव, तुमचा पत्ता, तुमचा व्यवसाय , तुमचे उत्पन्न किती आहे आणि इतर वैयक्तिक माहिती त्या फॉर्ममध्ये भरावी लागते.

अशाप्रकारे केवायसी फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन बँकेचा जाणे आणि केवायसी फॉर्म भरावा.

KYC कधी करावी लागते

जर ग्राहकांना नवीन बँक खाते उघडायचे असेल, नवीन क्रेडिट कार्ड किंवा कर्ज घ्यायचे असेल, डिजिटल वॉलेट आणि मोबाईल कनेक्शन घेताना केवायसी प्रक्रिया करणे आवश्यक असते. केवायसी तूमची ओळख पडताळणी करतात.

केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही बदल झाल्यास केवायसी प्रक्रिया ही पुन्हा करावी लागते.

केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर तुमच्या खात्यावर काही निर्बंध लागू शकते, आणि तुमचे खाते बंद पडू शकते

केवायसी (KYC) चे प्रकार

Biometric KYC – (बायोमेट्रिक केवायसी) – बायोमेट्रिक केवायसी म्हणजे या केवायसी प्रक्रियेमध्ये फिंगर प्रिंट, चेहरा स्कॅन करून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते या प्रक्रियेला know your customer असे म्हणून ओळखले जातात.

Aadhar OTP KYC – (आधार ओटीपी आधारित केवायसी) – या प्रक्रियेमध्ये ग्राहकांचा बारा अंकी आधार नंबर टाकून तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जातो. मोबाईल वर आलेला ओटीपी नंबर टाकून तुमची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केली जाते. ही प्रकिया व्यवहाराच्या माध्यमातून ग्राहकांची ओळख आणि वेरिफिकेशन करण्यासाठी वापरले जाते.

Video KYC – ( व्हिडिओ आधारित केवायसी) – व्हिडिओ व्हिडिओ केवायसी या केवायसी प्रक्रियेमध्ये व्हिडिओ तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकाची ओळख पडताळणी केली जाते या प्रक्रियेमध्ये ग्राहक त्यांचा आयडी, कागदपत्रे, उदाहरणार्थ पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, कागदपत्रांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

ऑनलाइन वेरिफिकेशन (Online Verification )म्हणजे काय?

ऑनलाइन वेरिफिकेशन म्हणजे – इंटरनेटचा वापर करून ग्राहकांची ओळख पटवून देण्याच्या प्रक्रियेला ऑनलाइन वेरिफिकेशन असे म्हणतात. या प्रक्रियेमध्ये ग्राहकांची कागदपत्रे त्याची वैयक्तिक माहिती डिजिटल पद्धतीने तपासली जाते. आणि ही प्रक्रिया अतिशय वेगवान, सोपी, आणि सुरक्षित असते.

या ऑनलाइन वेरिफिकेशन पद्धतीने ग्राहकांची ओळख आणि पत्ता डिजिटल दुपार सादर करावे लागतात त्यामध्ये ग्राहकाची ग्राहकांच्या आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट कागदपत्रे अपलोड केले जातात. तसेच आधार ओटीपी च्या माध्यमातून ऑनलाईन वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केली जाते, सोबतच व्हिडिओ केवायसी च्या माध्यमातून सुद्धा ग्राहकाच्या ओळखपत्राची पडताळणी करून केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.

ऑफलाइन वेरिफिकेशन (Offline Verification )म्हणजे काय?

ऑफलाइन वेरिफिकेशन म्हणजे – प्रक्रियेमध्ये ग्राहकाची ओळख आणि पत्ताची पडताळणी करण्यासाठी ग्राहकांना स्वतः बँक किंवा इतर संस्थांमध्ये प्रत्यक्षपणे जाऊनच कागदपत्रासह ((जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट)) पुरावे जमा करावे लागतात. ही ऑफलाइन प्रक्रिया ग्राहकाच्या समक्ष पूर्ण केली जाते. यासाठी ग्राहकाला स्वतः त्या ठिकाणी हजर राहावे लागतात.

तर अशाप्रकारे आपण (KYC Full Form In Marathi) केवायसी फुल फॉर्म मराठी मध्ये केवायसी म्हणजे काय, केवायसी प्रक्रिया कशी केली जाते केवायसी का करावी लागतात अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण येथे पाहिली आहेत. तुम्हाला केवायसी म्हणजे काय,आणि केवायसी करणे का गरजेचे आहे हे चांगले समजले असेल. जर तुमच्या मित्र परिवारा पैकी कोणाला केवायसी बद्दल माहिती नसेल तर लेख त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. जर तुम्हाला केवायसी बद्दल अधिक प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये प्रश्न विचारू शकता.

आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.

आणखी हेही वाचा – What Is OTP Full Form In Marathi | OTP काय आहे ?

आणखी हेही वाचा – DBT Full Form And Meaning | डीबीटी फूल फॉर्म

आणखी हेही वाचा What Is The full Meaning Of a.t.m | ATM Full Form

Sharing Is Caring: