PIN Full Form In Marathi | PIN म्हणजे काय जाणून घ्या.

PIN Full Form In Marathi – तर आपण आजच्या लेक मध्ये पिन चा फुल फॉर्म बघणार आहोत. पिन चा वापर कोणकोणत्या व्यवहारासाठी केला जातो व कोणकोणत्या ठिकाणी केला जातो याची माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत पिन नंबर हा का आवश्यक असतो त्यामुळे होणारे फायदे तोटे आपण इथे बघणार आहोत तर चला तीन चा फुल फॉर्म काय आहे ते आपण बघूया.

आपल्या बँक खात्याला सुरक्षित ठेवण्यासाठी एक पिन असणे खूप आवश्यक असते. आजकाल बरेच फसवणुकीचे काम चालू आहे त्यामुळे कोणतेही ऑनलाइन एप्लीकेशनचा वापर करत असाल तर त्या साठी तुम्हाला एक पर्सनल ओळख क्रमांक हा वापरावाच लागतो. PIN Full Form In Marathi

PIN Full Form In Marathi | What Is PIN Meaning in Marathi

PIN – (‘Personal Identification Number‘) असा आहे.

PIN Full Form In Marathi – Personal Identification Number

PIN चा फुल फॉर्म मराठी मध्ये आणि PIN म्हणजे नक्की काय – वैयक्तिक ओळख क्रमांक, किंवा व्यक्तिगत ओळख क्रमांक असे सुद्धा आपण म्हणू शकतो.

हा क्रमांक 4-5 अंकांचा असतो. या PIN ला गुप्तपीन असे म्हटले जाते.

हा प्रत्येकाचा एक वैयक्तिक आणि पर्सनल PIN नंबर असतो. हा असा पिन असतो जो तुमच्या बँक खात्याशी किंवा एटीएम कार्डच्या सुरक्षिततेसाठी वापरला जात असतो.

PIN म्हणजे काय ? | What Is PIN ?

PIN म्हणजे वैयक्तिक ओळख क्रमांक हा एक वेगळा नंबर असतो. जो व्यवहार करतांना वापरला जातो.

तुमचा वापर एटीएम मधील पैसे काढण्यासाठी किंवा पैसे टाकण्यासाठी किंवा इतर व्यवहार करण्यासाठी केला जातो तीन टाकल्याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही.

जर तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला कोणतेही ऑनलाईन काम करायचे असेल तर तुम्हाला पिन टाकूनच पुढील प्रोसेस करावी लागते.

जर तुम्ही कोणतेही बँकिंग आपलिकेशन वापर करत असाल आणि तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे असेल तर तुम्हाला PIN चा वापर करावा लागतो.

तुम्हाला कोणतीही यूपीआय ॲप्स मध्ये व्यवहार करायचे असेल तर त्याही साठी तुम्हाला PIN चा वापर करावा लागतो.

PIN चा वापर कुठे कुठे केला जातो

  • एटीएम मशीन – PIN चा वापर एटीएम मधून पैसे काढता वेळेस केला जातो, एटीएम मधून पैसे काढायचे असेल किंवा इतर व्यवहार तपासायचे असेल तर पुढील प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला तीन नंबर हा टाकावा लागतो.
  • डेबिट/क्रेडिट कार्ड – जर तुम्हाला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड चा वापर करून खरेदी करायची असेल, कोणतीही बिल भरायचे असेल, किंवा इतर व्यवहार करायचे असेल तर तुम्हाला सर्वात आधी पिन नंबर टाकावा लागतो.
  • मोबाईल बँकिंग अप्लिकेशन – जर तुम्ही मोबाईल बँकिंग अप्लिकेशन वापरत असाल तर ॲप लॉगिन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला PIN नंबरचा वापर करावा लागतो.
  • UPI अप्लिकेशन- तुम्हाला यूपीआय च्या माध्यमातून कोणतेही व्यवहार करायचे असेल तर तुम्हाला पिन नंबर टाकावा लागतो. तसेच बिल भरणे, ऑनलाईन शॉपिंग करणे, जेवण ऑर्डर करणे, किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला पिन नंबर विचारला जात असतो.

PIN मुळे होणारे फायदे

बँक खाते, एटीएम कार्ड,आणि मोबाईल बँकिंग, यासाठी पिन नंबर चा वापर अतिशय महत्त्वाचा असतो. PIN मुळे तुमच्या खात्यातील व्यवहार हे सुरक्षितपणे होऊ शकते.

कोणतेही व्यवहार करायचे असल्यास तुम्हाला सर्वात आधी PIN टाकावा लागतो त्यामुळे तुमच्या खात्याचे पुष्टीकरण केले जाते. हा एक खाताच्या सुरक्षा साठीचा महत्त्वाचा भाग आहे.

PIN हा तुमचा वैयक्तिक ओळख क्रमांक असतो. त्यामुळे हा फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती असायला हवा तुमचे खाते हे गोपनीय असायला हवे.

तुमचा पिन कोणालाही शेअर करू नका.

PIN मुळे होणारे तोटे

PIN विसरणे – समजा तुम्ही तुमचा पिन नंबर विसरला तर तुम्हाला तुमच्या खात्या संबंधी अडचणी येऊ शकतात.

जर तुम्ही तुमचा पिन नंबर विसरला असाल तर तुम्हाला नवीन पिन तयार करण्यासाठी बँकेची संपर्क करावा लागतो किंवा कधी कधी ही प्रक्रिया होण्यासाठी तुम्हाला त्रास सहन करावा लागतो.

  • PIN ब्लॉक होण्याची – समजा तुम्ही पिन वारंवार टाकत असेल तर तुमचे खाते ब्लॉक होण्याची शक्यता जास्त असते. आणि ते खाते अनलॉक करण्यासाठी तुम्हाला बँकेची संपर्क करावा लागतो.
  • PIN चोरीचा धोका– जर तुमचा PIN इतरांना माहीत झाला तर तुमच्या खात्यातील पैसे चोरीला जाण्याची शक्यता असते. किंवा फसवणूक करून तुमच्या खात्यातील रक्कम काढू शकतात.
  • PIN वारंवर टाकण्याची गरज पडल्यास – कधी कधी छोट्या छोट्या वापर करावा लागतो, त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात.
  • काही तांत्रिक– कारणांमुळे मोबाईल बँकिंग ॲप व्यवस्थितपणे काम करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला बऱ्याच समस्यांना समोर जावे लागतात.
  • धोका – जर तुमचा मोबाईल नंबर हरवला किंवा चोरीला गेला तर तुमच्या खात्याची रक्कम चोरीला जाण्याची दाट शक्यता असते

MPIN आणि PIN याच्यामधील फरक

MPIN (मोबाइल व्यक्तिगत ओळख क्रमांक) – मोबाइल बँकिंग अॅप्स आणि UPI व्यवहार करतांना वापर होतो.

PIN (व्यक्तिगत ओळख क्रमांक) – ATM, कार्ड पेमेंट्स, डिजिटल सेवांमध्ये वापर केला जातो.

PIN वैयक्तिक ओळख क्रमांक

  • एटीएम आणि डेबिट कार्ड वर क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी किंवा ऑनलाइन बिल पेमेंट करण्यासाठी कार्ड वापरताना पिन चा वापर केला जातो.
  • काही डिजिटल सेवा चा लाभ घेण्यासाठी सुद्धा आपल्याला तीन चा वापर करावा लागतो.

MPINमोबाइल व्यक्तिगत ओळख क्रमांक

  • आपल्याला जर मोबाईल बँकिंग किंवा यूपीआय बँकिंग चे व्यवहार करायचे असेल तर ॲप लॉगिन करण्यासाठी किंवा यूपीआयने पैसे पाठविण्यासाठी एमपीन चा वापर केला जातो.
  • UPI चे व्यवहार करण्यासाठी सर्वात जास्त वापर MPIN चा केला जातो, जसे की ऑनलाईन पैसे पाठवणे, ऑनलाईन बिल पेमेंट करणे, जेवण ऑर्डर करणे, शॉपिंग करणे, रिचार्ज करणे ,इत्यादी इत्यादी गोष्टी.

तर अशाप्रकारे आपण आजच्या लेखांमध्ये PIN म्हणजे काय, PIN होणारे फायदे आणि तोटे , त्याचा PIN वापर कसा करावा आणि दोघामधील फरक या बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. जर तुमच्यापैकी कोणाला याबद्दल माहिती नसेल तर हा लेख तुम्ही नक्की त्यांच्यापर्यंत पोचवावा.

आणि आशा आहे की तुम्हाला PIN कोणतेही डेबिट ,क्रेडिट कार्डस किंवा डिजिटल सेवा वापरत असाल तर PIN चा वापर कसा करावा आणि काळजी कशी घ्यावी. याबद्दल चांगले समजले असेल.. जर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच प्रश्न विचारू शकता..

आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.

आणखी हेही वाचा – What Is OTP Full Form In Marathi | OTP काय आहे ?

आणखी हेही वाचा – DBT Full Form And Meaning | डीबीटी फूल फॉर्म

आणखी हेही वाचा What Is The full Meaning Of a.t.m | ATM Full Form

Sharing Is Caring:

Leave a Comment