Chatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज निबंध

Chatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi | माझा आदर्श शिवाजी महाराज निबंध

छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजातील एक महान योद्धा. महाराज आपल्या भारताचे इतिहास घडविणारे एक अतिशय शूर आणि राजनेता आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श आहे. महाराजांचे जीवन चरित्र इतिहासातील त्याची कामगिरी लक्षात घेऊन आपल्या या  लेखात आदर्श पुरुष छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठीमध्ये. या निबंधात महाराजांचे  इतिहास कालीन कार्याचे पराक्रम आणि धाडस ,क्रूरता विषयी ह्या निबंधात आपण घेऊन येणार आहे. Shivaji Maharaj Nibandh तुमच्या शालेय जीवनात उपयोगी पडेल आणि तसेच तुमच्या खऱ्या जीवनात एक प्रेरणा दिईल महाराज त्यांच्या  धाडसीवृतीने, रणनीतीने आणि समाजासाठी केलेल्या कामगिरी ओळखले जाते.. तर चला या निबंधात आपण शिवाजी महाराज निबंध लिहूया..Chatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi

Chatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi
Chatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज :  सर्वव्यापी  शिवाजी महाराज जीवन कार्य आणि महान विचारवंतावर हा निबंध आहे. एक महान आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांची जंयती  19 फेब्रुवारी या रोजी मोठ्या उत्साहाने साजरी करतात. शिवाजी जयंती निमित्याने या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर करण्यात येते. या महान राजाचे नाव शिवाई या देवतेच्या नावावरून शिवाजी असे दिले. शिवाजी महाराज मराठा साम्राज्यांचे रयतेचे राजा होते. त्यांनी अशक्य असणारे स्वराज राज्याचे स्वप्न पूर्ण केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्यातील जुन्नर शहरानजीक शिवनेरी या गडावर झाला.त्यांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले ते  आदिलशाहीचे सरदार होते आणि आईचे नाव जिजाबाई. आई जिजाबाई एक धर्मप्रेमी आणि धैर्यवान स्त्री होती. शिवाजी महाराज  खूप शूर आणि बुद्धिमान होते. त्यांनी वाडीलासोबत जास्त वेळ घातला नाही. पण आई जिजाबाईने शिवाजी महाराजांना चांगले संस्कार व शिक्षण दिले सोबतच रामायण, महाभारत आणि अन्य धर्मग्रंथांद्वारे नैतिक आणि धार्मिक संस्कार केले. लहानपणापासूनच महाराजाच्या मनात स्वराजाबद्दल  आणि स्वराज्यासाठी ज्योत पेटवली आहे. महाराज धाडसी असल्यामुळे त्यांना पराक्रम,न्याय आणि धर्माचे धडे गिरवले होते त्यामुळे महाराजांनी कमी वयातच आपल्या स्वराज्यासाठी सर्व जावाबदाऱ्या पार पडायला सुरुवात केली.

स्वराज्य स्थापनेचा आरंभ

महाराजांनी घोडदौड सुरू केली त्यासाठी त्यांनी तानाजी मालुस,रे बाजी प्रभू, देशपांडे, मुरारबाजी, जीवमहाल असे काही मावळे तयार केले त्याच मावळ्यांसोबत रायरेश्वरच्या मंदिरात जाऊन स्वराज स्थापनेची प्रतिज्ञा केली.आणि सन १६४५ मध्ये  तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि हिंदवी स्वराज स्थापन केले. महाराजांनी  मूठ भर मावळ्यांसोबत अनेक गड किल्ले जिंकून स्वराज्याचा मोठा विस्तार केला.अश्या प्रकारे आई जिजाऊचे स्वप्न महाराजांनी पूर्ण केले.सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जनतेसाठी सुरक्षा आणि ज्ञान मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले.Chatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi

युद्धनीती आणि गनिमी कावा -महाराजाना माहिती होते मुघलाकडे जास्त  सैन्य दल आहे  त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या क्रूर बुद्धीचा वापर करून  युद्धनीती रचवली आणि शत्रूंना पराभूत केले. गनिमी कावामध्ये छापा मारून अचानक हल्ला करणे आणि शत्रूला आश्चर्यचकित करणे हे प्रमुख होते.प्रतापगडच्या लढाईत त्यांनी अफजल खानाचा वध करून आपल्या रणनीतीचे कौशल्य दाखवले.

सागरी संरक्षण साठी शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाची स्थापना केली. त्यांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, आणि अन्य जलदुर्गांची यामुळे सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंना अडवण्यात येते होते.शिवाजी महाराजांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणून समाजसुधारणा केल्या. त्यांनी आपल्या राज्यात सर्व धर्मांवर समान न्याय दिला. त्यांच्या दरबारात मुस्लिम अधिकारी होते आणि त्यांनी कोणत्याही धर्माच्या लोकांवर अत्याचार केला नाही. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांच्या सन्मानाचे संरक्षण केले.

शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी आणि प्रशासनासाठी किल्ल्यांचे महत्त्व ओळखले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक किल्ल्यांची निर्मिती आणि पुनर्बांधणी केली. रायगड, प्रतापगड, राजगड, आणि सिंधुदुर्ग हे किल्ले त्यांच्या नेतृत्वाखालील अभियंत आणि शिल्पकारांनी बांधले. या किल्ल्यांनी मराठा साम्राज्याच्या संरक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

शिवराज्याभिषेक ही एक महत्व पूर्ण ऐतिहासिक घटना होती, जी ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर पार पडली. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना करून स्वराज्याचे स्वप्न साकार केले. त्यांनी केलेल्या या राज्याभिषेकाने त्याच्या नावा पुढे नेहमी “छत्रपती”असे नाव घेलते जाते. हा राज्याभिषेक सोहळा अनेक महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विधींचे पालन करून . राज्याभिषेक सोहळा पर पाडण्यात आला. गागाभट्ट या विद्वान ब्राह्मणाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. या सोहळ्यात अनेक राजकीय, धार्मिक आणि सामाजिक नेत्यांची उपस्थिती होती. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी अनेक सुधारणा व योजनांची घोषणा केल्या, त्या घोषणा राज्यकारभारासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. राज्याभिषेकानंतर त्यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अनेक मोहिमा हाती घेतल्या आणि मराठा साम्राज्याला अभूतपूर्व यश मिळवून दिले.

शिवाजी महाराजांची अंतिम दिवस – शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण जीवन स्वराज्य आणि जनतेच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यांचा मृत्यू  ३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावर झाला. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या कार्याची आठवण आजही जीवंत आहे. त्यांच्या आदर्शांचा प्रचार आजही जगभरात गाजत आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धा, कुशल प्रशासक आणि समाजसुधारक होते. त्यांच्या जीवनातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने आजही अनेकांना प्रेरणा मिळते. त्यांच्या कार्याचे आणि त्यागाचे स्मरण करणे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जय भवानी, जय शिवाजी!

तर आज आपण पावसाळा( Chatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi ) या विषयी छान आणि महत्व पूर्ण पैलू सोबत हा विशेष निबंध लिहलेला आहे.Chatrapati Shivaji Maharaj History Essay in Marathi, छत्रपती शिवाजी महाराज निबंध, Shivaji Maharaj History Essay in Marathi, या सर्वाचा समावेश आहे. तर मित्रांनो तुम्ही हा निबंध वाचा आणि तुमच्या शालेय जीवनात म्हणजेच निबंध लेखन उपयुक्त येईल असा हा लेख आहे. आणि तुमच्या आयुष्यात प्रेरणा देईल अश्या महाराजांचे काही प्रेरणादायि विचारांचासमावेश ह्या लेखात केला आहे . हा लेख आवडल्यास तुमच्या सर्व मित्र मैत्रीणी नक्कीच पाठवा.

अश्याच छान छान निबंध लेखनासाठी आमच्या lekhmarathi.com या वेबसाइट ला भेट द्या….

आणखी हेही वाचा– Mazi Aai Nibandh Marathi | माझी आई निबंध मराठी 300 शब्द

आणखी हेही वाचा Mazi Shala Nibandh in Marathi | माझी शाळा निबंध

Sharing Is Caring:

Leave a Comment