बिरसा मुंडा कोण होते ? आदिवासी स्वातंत्र्य सेनानीची कहाणी | who is birsa munda ?

who is birsa munda -(birsa munda -The public figure) बिरसा मुंडा हे भारत देशाचे एक महत्त्वपूर्ण आदिवासी स्वतंत्रवीर होते. बिरसा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी उलिहाटू, खुंटी, झारखंड येथे आदिवासी कुटुंबात झाला होता.आणि ते झारखंड आणि जवळपासच्या प्रदेशा मधील मुंडा या आदिवासी समुदायाचे नेते होते.बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या न्यायासाठी केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे.त्यांची कामगिरी इत्यादि गोष्टी आणि त्याच्या जीवनातील सर्व महत्वपूर्ण माहिती आपल्या लेखात पाहणार आहोत.

who is birsa munda | बिरसा मुंडा कोण,जन्म आणि जीवनातील संघर्ष

who is birsa munda : क्रांतिसूर्य बिरसा मुंडा

Birsa Munda History in Marathi | बिरसा मुंडा यांचा इतिहास आणि जीवनचरित्र

बिरसा मुंडा जन्म : बिरसा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी उलिहाटू, खुंटी, झारखंड येथे आदिवासी कुटुंबात झाला होता. बिरसा मुंडा यांचे वडील सुग्ना मुंडा हे शेतमजूर होते आणि आई करमी हाटू हे होते. बिरसा मुंडा चार मुलांपैकी एक होते. आणि दस्कीर,चंपा या दोन मोठ्या बहिणी तसेच कोमटा मुंडा नावाचा एक मोठा भाऊ होता.

बिरसा मुंडा यांच्या कुटुंबाचे जीवन हे पूर्णता शेतीवरच अवलंबून होते.आणि हे आदिवासी असल्यामुळे त्यांचे जीवनशैलीमध्ये सर्व आदिवासी हे त जंगलांतील वनसंपत्तीवर आणि अन्य गोष्टीवर अवलंबून होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परीस्थिती ही खूप बेताची असूनही त्यांना आपल्या पारंपरिक आदिवासी जीवनशैलीतूनच संस्कार मिळाले. बिरसा मुंडा लहान असतानी त्यांना ब्रिटिश शासन आणि स्थानिक जमींदारांच्या अत्याचारांचा अनुभव होता, आणि त्यामुळेच त्यांच्यात अन्यायाविरुद्ध लढा घेण्याची प्रेरणा निर्माण झाली. रिवार मुंडा वांशिक आदिवासी गटाचे सदस्य हे बिरसा मुंडा होते. त्यांना बालपणापासूनच बासरी वादनाची खूप आवड होती.

जयपाल नागने त्यांना जर्मन मिशन स्कूलमध्ये बिरसा मुंडा यांचा प्रवेश करून दिला। बिरसा हे एक उत्साही विद्यार्थी होते.आणि जयपाल नाग हे सालगा येथील एका शाळेचे प्रमुख असल्यामुळे बिरसा मुंडा याचे प्रारंभिक शिक्षण झाले.नतर, ते बिरसा डेव्हिड बनले आणि ख्रिश्चन झाल्यानंतर शाळेत दाखल झाले. तेथे त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि सोबतच अनेक वर्षेही काढली.

विविध वन्य औषधीं व त्याचा योग्य उपयोग यावर त्यांनी खूप अभ्यास अभ्यास केला.तसेच वैष्णव आनंद पांडा या प्रसिद्ध असलेल्या व्यक्ति सोबतच राहून बिरसानी हिंदू धर्माची शिक्षण शिकून घेतले. त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचे हे वाचन केले. बिरसा यांनी एक चळवळ चालू करून त्या अंतर्गत त्यांनी गावोगाव फिरून परिस्थितीने त्रासलेल्या सर्व समाजातील आदिवासीना जीवनाचे मूल्ये, स्वाभिमान, संस्कृती भूमी प्रेम, आरोग्य, शिक्षण या सर्वाचे चांगलेच महत्त्व समजवून सांगितले . महामारीच्या काळात निस्वार्थपणे जनसेवाही बिरसा मुंडा यांनी केलेली आहे.  

१८८२ मध्ये ‘भारतीय जंगल अधिनियम कायदा’ केला आणि त्याचा गैरवापर करत होते. तर ब्रिटिशाचे, अत्याचार तसेच धर्मांतरणासाठी मिशनऱ्यांचा मोट्या प्रमाणावर जोर लावून काम चालू झाले होते.कर सक्ती करून आदिवासी लोकांना कर्जबाजारी करून ठेवले होते. त्यांचे जंगल हिरावून घेत असे, अश्या बऱ्याच अत्याचारणे आदिवासी ग्रस्त झाले होते. आधीच त्यांना ब्रिटिशांनी विविध अटी लावून शोषून घेत घ्यायचे.  

ब्रिटिश लोकांमध्ये चळवळ (Movement among the British people in Marathi)

बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखालील चळवळ मुख्यतः 1899-1900 या काळात ब्रिटिश राजवटीविरुद्ध झाली. ही चळवळ मुंडा आदिवासी समुदायाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध होती. या चळवळीचे प्रमुख मुद्दे आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध केलेली आंदोलने खालीलप्रमाणे आहेत:

  1. भूमिका आंदोलन:
    समुदायाला त्यांच्या पारंपरिक असलेल्या जमिनी आणि वनसंपत्तीवर हक्क मिळवून देण्यासाठी प्रोत्साहित केले. होते. बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या जमिन हक्क मिळवून देण्यासाठी पुनर्स्थापनेचा प्रयत्न केला.
  2. ब्रिटीश विरुद्ध विद्रोह:
    ब्रिटिश सरकारविरुद्ध 1899 मध्ये बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाने उग्र रूप घेण्यात आले होते. या आंदोलनात ब्रिटिश सरकारच्या कार्यालयांवर हल्ले केले, त्यांची सरकारी असलेली सर्व मालमत्ता जाळून टाकली आणि नं तर कर भरण्यास सक्त नकार दिला. म्हणून हा विद्रोह “उलगुलान” (महान विद्रोह)ओळखण्यात येते.
  3. अटक आणि मृत्यू:
    ब्रिटिश सरकारने बिरसा मुंडा यांना अटक केली आणि त्यांना रांचीच्या तुरुंगात ठेवले. तुरुंगातच 9 जून 1900 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमागे विषबाधेचा संशय आहे, परंतु अधिकृत माहितीमध्ये त्यांना तापाने ग्रासले असे म्हटले जाते.
  4. परिणाम:
    बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखालील या चळवळीमुळे ब्रिटिश सरकारला आदिवासींच्या समस्यांकडे लक्ष देण्यास भाग पाडले. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या चळवळीने आदिवासी समाजात जागृती निर्माण केली आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली.

बिरसा मुंडा यांच्या चळवळीने ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले आणि त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची शक्ती दिली. त्यांचे कार्य आणि त्यांची चळवळ भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे.

बिरसा मुंडा यांनी आदिवासी संघटनेची निर्मिती (Creation of tribal organization by Birsa Munda)

  1. बिरसाइट चळवळ:
    अनुयायांना एकत्र करून एक धार्मिक चळवळ सुरू केली, जीला ‘बिरसाइट’ या नावाने सुरू झाली होती या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट हे आदिवासी समजामध्ये पुनरुज्जीवन करणे सामाजिक सुधारणा घडवून आणणे असे होते. आणि नंतर ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मांतराच्या विरोधातही ते उभे राहिले होते.
  2. सामाजिक संघटन:
    समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, आणि अन्य सामाजिक कुप्रथांचा विरोध करून त्यांनी आदिवासींना शिक्षणाचे , महत्व, स्वाभिमानाचे महत्व यांचा फरक पटवून देण्याचे काम त्यांनी तयार केलेल्या संघटनाने एकत्र येवून केले.बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजात आर्थिक आणि सामाजिक सुधारणा केल्या.
  3. आर्थिक सुधारणांचे प्रयत्न:
    जमिन आणि वनसंपत्ती यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सर्व आदिवासीय एकत्रित केले.त्यांच्यावर होणाऱ्या शोषणाविरुद्ध लढण्यास प्रेरणा दिली आणि ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध एक मोठा आवाज उठवला.

बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखालील आदिवासी संघटना आणि त्यांच्या चळवळीने आदिवासी समाजात एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या कार्यामुळे त्यांनी आदिवासी समाजात एक महान नेता आणि प्रेरणा स्त्रोत म्हणून स्थान मिळवले आहे.

बिरसा मुंडा स्मारके (Monuments of Birsa Munda in Marathi)

  • बिरसा मुंडा स्मारके यांच्या स्मरणार्थ विविध स्मारके, सार्वजनिक स्थळे, आणि संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांचे योगदान आणि कार्य अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. काही प्रमुख स्मारके आणि त्यांच्या नावाने ओळखली जाणारी ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत:
  1. बिरसा मुंडा स्मारक, रांची:
    झारखंड राज्यातील रांची शहरात बिरसा मुंडा यांचे स्मारक आहे.आणि त्यांचा पुतळा आहे.
  2. बिरसा मुंडा विमानतळ, रांची: रांची या शहरातील विमानतळाचे नामकरण “बिरसा मुंडा विमानतळ” म्हणून देण्यात आले आहे. हे विमानतळ बिरसा यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करते.
  3. बिरसा मुंडा विद्यापीठ: झारखंड राज्यात बिरसा मुंडा यांच्या नावाने अनेक शैक्षणिक संस्थांचे नामकरण करण्यात आले आहे. “बिरसा कृषि विद्यापीठ” (Birsa Agricultural University) हे एक प्रमुख उदाहरण आहे.
  4. बिरसा मुंडा संग्रहालय: बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित संग्रहालय झारखंडमध्ये आहे, जेथे त्यांच्या जीवनाची कथा, त्यांच्या लढ्याची माहिती, आणि त्यांच्या योगदानाचे प्रदर्शन केले जाते.
  5. बिरसा चौक: भारता मधील विविध शहरांमध्ये “बिरसा चौक” या नावाने चौकांचे नामकरण करण्यात आले आहे, सोबतच त्यांच्या पुतळ्यांचीही स्थापना करण्यात आली आहे.
  6. चलनावर बिरसा मुंडा: भारतीय रिझर्व्ह बँकेने बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसह 5 रुपयांच्या नाण्याचे प्रकाशन केले आहे.
  7. सार्वजनिक शाळा आणि महाविद्यालये: बिरसा मुंडा यांच्या नावाने अनेक शाळा आणि महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत, तिथे त्यांच्या जीवनाची माहिती आणि त्यांचे आदर्श विद्यार्थ्यांना शिकवले जातात.
  8. बिरसा मुंडा टाऊन हॉल: काही शहरी भागात टाऊन हॉल किंवा सभागृहांचे नामकरण त्यांच्या नावाने करण्यात आले आहे, जिथे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
  9. बिरसा मुंडा वन्यजीव अभयारण्य: झारखंडमध्ये बिरसा मुंडा यांच्या नावाने वन्यजीव अभयारण्याचे नामकरण करण्यात आले आहे, जिथे वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन केले जाते.
  10. स्मृतिदिन आणि जयंती साजरी: बिरसा मुंडा यांची जयंती (15 नोव्हेंबर) आणि स्मृतिदिन (9 जून) विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जाते, ज्या अंतर्गत त्यांच्या योगदानाची आठवण ठेवली जाते.
  11. बिरसा मुंडा यांच्या स्मारकांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या संघर्षाची माहिती नवीन पिढ्यांना मिळते आणि त्यांचा आदर राखला जातो.

बिरसा मुंडा पुण्यतिथी (Death of Birsa Munda in Marathi)

बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांनी केलेल्या अत्याचारविरुद्ध आणि आदिवासीयांच्या हक्कांसाठी लढा दिला होता. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना “धरती आबा” असे म्हणून ओळखले जाते.
बिरसा मुंडा यांचा मृत्यू ते ९ जून १९०० रोजी झाले. त्यांच्या पुण्यतिथीला सर्व आदिवासी आणि भारताचे सर्व लोक त्यांना आदरांजली अर्पण करतात. त्यांच्या बलिदानामुळे आणि संघर्षामुळे आदिवासी समाजाला जागरूकता मिळाली आहे आणि स्वातंत्र्यलढ्यातही बिरसा मुंडा यांचा मोठा सहभाग होता.
बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी हा दिवस आदिवासी समाजासाठी आणि सर्व भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करायला पाहिजे.

सोबतच अनेक आदिवासी कांतिकारी तंटया भिल्ल, राणी दुर्गावती, झलकारी देवी, नारायणसिंह उईके, राघोजी भांगरे, संभाजी नखाते, गया मुंडा यांनी आपले आपल्या आदिवासीयांचे अस्तित्व,हक्क आणि भूमी या साठी बलिदान दिले. या सर्व क्रांतिकारांची सामाजिक चळवळीचे महत्त्वाचे योगदान आहे. म्हणूनच या सर्व वीर नेते यांचे जीवनकार्य व योगदान आदिवासीं समाजासाठी प्रेरणादायक आहे.

तर आपण आजच्या लेखात who is birsa munda | बिरसा मुंडा कोण आहे ? आणि बिरसा मुंडा यांचा इतिहास (Birsa Munda History in Marathi) Birsa Munda बद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. जर तुमच्या कडे Birsa Munda in Marathi बद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला शेअर करा. हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा.

Sharing Is Caring:

Leave a Comment