What Is Swift Code In Bank – मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण स्विफ्ट कोड म्हणजे काय त्याचा उपयोग कुठे केला जातो. आणि तो कुठे शोधावा या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखांमध्ये बघणार आहोत तर चला बघूया स्विफ्ट कोड म्हणजे काय आणि त्याबद्दल ची पूर्ण माहिती.
What Is Swift Code In Bank | स्विफ्ट कोड बद्दल पूर्ण माहिती
SWIFT कोड चे स्वरूप म्हणजे (जागतिक आंतरबँक वित्तीय संवाद संस्था) Society for Worldwide Interbank Financial Telecommunication असा आहे.
SWIFT CODE Full Form– ” सोसायटी फॉर वर्ल्ड इंटर बँक फायनान्शियल कम्युनिकेशन ” Society for Worldwide Interbank Financial
तर SWIFT कोड म्हणजे (Society for Worldwide Interbank Financial Telecommunication ) आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरला जातो आणि याचा उपयोग बँका आणि आर्थिक संस्थांमध्ये सुरक्षित व जलद निधी पाठवण्याकरिता वेगवेगळ्या देशातील बँकांमध्ये व्यवहार सहज आणि सुलभ पद्धतीने होतात.
SWIFT कोडमध्ये एकूण 8 किंवा 11 अल्फान्यूमेरिक अक्षरे असतात. या कोडचे तीन मुख्य भाग असतात बँक कोड (Bank Code) पहिली 4 अक्षरे बँकेचे नाव दर्शवतात. उदाहरणार्थ, SBIN हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे कोड आहे. देश कोड (Country Code)– पुढील 2 अक्षरे बँकेच्या देशाचे संकेत असतात. उदाहरणार्थ, IN म्हणजे भारत. स्थान कोड (Location Code)– पुढील 2 अक्षरे बँकेच्या शाखेचे ठिकाण दर्शवतात. शाखा कोड (Branch Code) (पर्यायी): काही SWIFT कोडमध्ये शेवटची 3 अक्षरे बँकेच्या विशिष्ट शाखेचा संकेत देतात. अशा प्रकारचे स्विफ्ट कोड ची रचना केलेली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चा SWIFT कोड: SBININBBXXX
- SBIN: बँकेचा कोड
- IN: भारताचा कोड
- BB: स्थान कोड (मुंबई)
- XXX: शाखा कोड (पर्यायी)
SWIFT कोडचा वापर कसा आणि कुठे होतो | What Is Swift Code Used For
आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण: जर तुम्हाला परदेशात पैसे पाठवायचे असतील किंवा परदेशातून पैसे घ्यायचे असतील, तर SWIFT कोड आवश्यक असतो.
फॉरेन एक्सचेंज व्यवहार: परदेशी चलन खरेदी किंवा विक्री करताना SWIFT कोड वापरला जातो.
आंतरराष्ट्रीय बँक व्यवहार: विविध प्रकारच्या बँकिंग सेवांसाठी, जसे की आयात-निर्यात व्यवहार, SWIFT कोडची आवश्यकता असते.
SWIFT कोड कसा शोधावा?
- स्विफ्ट कोड हा बँकेच्या वेबसाइटवर SWIFT कोड स्वरूपात दिलेला असतो.
- तुम्ही तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधूनही तुम्ही हा कोड मिळवू शकता.
- बँकेच्या चेकबुक किंवा पासबुकवर देखील SWIFT कोड असू शकतो.
उदाहरण:
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चा SWIFT कोड: SBININBBXXX (इथे “SBIN” बँकेचा कोड आहे, “IN” भारताचे संकेत आहे, “BB” बँकेचे स्थान आहे, आणि “XXX” हे शाखेचे संकेत असू शकतात).
SWIFT कोड आणि IFSC कोडमध्ये काय फरक | Differance Between SWIFT Code And IFSC Code
SWIFT कोड आणि IFSC कोड हे दोन्ही बँकिंग व्यवहारांमध्ये वापरले जातात, परंतु त्यांचे उद्दिष्ट आणि कार्य वेगवेगळे आहेत. खालीलप्रमाणे त्यातील मुख्य फरक दिला आहे:
विशेषता | SWIFT कोड | IFSC कोड |
---|---|---|
पूर्ण स्वरूप | Society for Worldwide Interbank Financial Telecommunication | Indian Financial System Code |
उद्दिष्ट | आंतरराष्ट्रीय बँक व्यवहारांसाठी वापरला जातो | भारतातील स्थानिक बँक व्यवहारांसाठी वापरला जातो |
वापर | विदेशातून पैसे पाठवणे किंवा प्राप्त करणे | भारतातील ऑनलाइन फंड ट्रान्सफर (NEFT, RTGS, IMPS) साठी वापर |
रचना | 8 ते 11 अल्फान्यूमेरिक अक्षरांचा असतो | 11-अक्षरांचा अल्फान्यूमेरिक कोड असतो |
किंवा असतो कसा? | बँक, देश, आणि शाखेची ओळख करण्यासाठी वापरला जातो | विशिष्ट बँकेची शाखा ओळखण्यासाठी वापरला जातो |
कोणत्या व्यवहारांसाठी? | आंतरराष्ट्रीय स्तरावर पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी | भारतातील स्थानिक बँक व्यवहारांसाठी |
उदाहरण | SBININBBXXX (स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई) | SBIN0000454 (स्टेट बँक ऑफ इंडिया, पुणे शाखा) |
देशाची आवश्यकता | जागतिक स्तरावर कोणत्याही देशासाठी वापरला जातो | फक्त भारतात वापरला जातो |
SWIFT कोडची वैशिष्ट्ये:
- आंतरराष्ट्रीय स्तरावर बँक व्यवहारांसाठी वापरला जातो.
- एका देशातून दुसऱ्या देशात पैसे पाठवताना किंवा घेण्याचा व्यवहार होतो.
- प्रत्येक बँकेला आणि शाखेला एक विशिष्ट SWIFT कोड असतो.
IFSC कोडची वैशिष्ट्ये:
- भारतातील स्थानिक बँक व्यवहारांसाठी वापरला जातो.
- IFSC कोडद्वारे तुम्ही NEFT, RTGS, आणि IMPS सारख्या सुविधांचा वापर करून पैसे ट्रान्सफर करू शकता.
- IFSC कोडमध्ये बँकेचे नाव, शाखा आणि विशिष्ट कोड असतो.
SWIFT कोड हा आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी वापरला जातो, तर IFSC कोड हा फक्त भारतातील स्थानिक बँक व्यवहारांसाठी वापरला जातो. SWIFT कोड जागतिक स्तरावर बँका ओळखण्यासाठी वापरला जातो, तर IFSC कोड भारतातील विशिष्ट शाखा ओळखण्यासाठी वापरला जातो.
FAQS : What Is Swift Code In Bank
1. SWIFT कोड म्हणजे काय?
उत्तर: SWIFT कोड (Society for Worldwide Interbank Financial Telecommunication) हा एक अनोखा कोड आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकांमधील आर्थिक व्यवहारांसाठी वापरला जातो.
2. SWIFT कोड कशासाठी वापरला जातो?
उत्तर: SWIFT कोडचा वापर आंतरराष्ट्रीय पैसे पाठवण्यासाठी आणि घेण्यासाठी केला जातो. हा कोड बँकेची आणि शाखेची अचूक ओळख पटवतो, ज्यामुळे व्यवहार सुरक्षित होतात.
3. SWIFT कोड कसा शोधावा?
उत्तर: तुम्ही बँकेच्या वेबसाइटवर, चेकबुकवर किंवा पासबुकवर SWIFT कोड शोधू शकता. तसेच, बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधून हा कोड मिळवू शकता.
5. SWIFT कोड आणि IFSC कोडमध्ये काय फरक आहे?
उत्तर: SWIFT कोड आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी वापरला जातो, तर IFSC कोड (Indian Financial System Code) भारतातील बँकांमधील व्यवहारांसाठी वापरला जातो.
6. SWIFT कोडशिवाय आंतरराष्ट्रीय व्यवहार होऊ शकतो का?
उत्तर: नाही, SWIFT कोडशिवाय आंतरराष्ट्रीय बँक व्यवहार करणे शक्य नाही, कारण हा कोड बँक आणि शाखेची अचूक ओळख करण्यासाठी आवश्यक असतो.
7. SWIFT कोडची पूर्ण स्वरूप काय आहे?
उत्तर: SWIFT म्हणजे Society for Worldwide Interbank Financial Telecommunication.
8.SWIFT कोड कुठे वापरला जातो?
उत्तर: SWIFT कोडचा वापर आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहारांसाठी, जसे की परदेशातून पैसे पाठवणे किंवा प्राप्त करणे, तसेच फॉरेन एक्सचेंज व्यवहारासाठी केला जातो.
तर आजच्या लेखात आपण SWIFT कोड म्हणजे काय ( What Is Swift Code In Bank) या बद्दल जाणून घेतले आहे. SWIFT कोड बद्दल सर्वाना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. ही माहिती तुम्ही नक्कीच वाचा. कारण SWIFT कोड काय आहे त्याचा वापर कसा केला जातो. SWIFT कोड कसा शोधायचा या बद्दलची सविस्तर माहिती आपण बघितली आहे. मिंत्रानो जर तुम्हाच्या मिंत्राना परिवारांना तसेच जे लोक बँकेच व्यवहार जास्त प्रमाणात करत असतात अश्या गरज व्यक्ति कडे नकीच पाठवा.
आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.
आणखी हेही वाचा – IMPS Full Form In Marathi| आयएमपीएस फूल फॉर्म
आणखी हेही वाचा – What Is Credit card | क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय ?