Pavsala Nibandh in Marathi- पावसाळा निबंध या विषयी आज आपण निबंध लिहणार आहोत. तर पावसाळा हा प्रत्येकाचा आवडता ऋतु आहे. त्यामुळे या विषयी निबंध लिहतात खूप मज्जा येणार आहे आणि काही आठवणी ताज्या होणार आहे. पावसाळ्यात आपला निसर्ग अतिशय सुंदर दिसतो. तर चला मिंत्रानो पावसाळा या वर छान मराठी मध्ये निबंध लिहू या.. Pavsala Nibandh in Marathi
Pavsala Nibandh in Marathi | पावसाळा निबंध मराठी | Pavsala Essay in Marathi| Maza Aavdata Rutu Pavsala Nibandh in Marathi
पावसाळा: निसर्गाची देण आहे पावसाळा..
पावसाळा हा निसर्गाच्या तीन ऋतूपैकी एक सुंदर ऋतू आहे. हा पावसाळा चार महिन्याचा असतो. जून महिन्यापासून पावसाची सुरुवात होत असते. पावसाळा सुरू होताच निसर्ग रम्य वातावरण होते.निसर्गाला हिरवागार रंग येतो, मोठ मोठ्या टेकड्यांना सुंदर रूप येते. पहिला पाऊस पडला की मातीचा सुघंध वास सगळीकडे दळवळतो. कोमजलेल्या काही गोष्टींना पावसाळ्यात जीव येतो.सर्व जंगलातील मोठमोठी झाडे झुडपे वनस्पती एकदम हिरवीगार आणि ताजेतवाने होतात. नदी ,तलाव,छोटे छोटे नाले आणि विहिरीपावसाळ्यात तुंब पाण्याने भरून जातात. निसर्गात एक नवा बदल होतो.या पावसाळ्यामुळे निसर्ग रम्य वातावरणात आनंद घ्यायला खूप मज्जा येते. पावसाळ्यामुळे शेतकरी, प्राणी, वनस्पतींना खूप फायदे होत असतात.
आवडत ऋतु म्हणजे पावसाळा- पाण्याचे एक थेंब मातीत पडतातच सर्व शेतकरी बांधवाना सर्वात जास्त आनंद होतो. ते उन्हाळ्यापासून या पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. या पावसामुळे पहिल्या सरीमुळे सगळ्याच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद उमटते त्यांना पाण्यात आनंद घ्यायला खूप मज्जा येते. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस खूप महत्वाचा असतो. त्यांच्या शेतामधील पीक वरच्या पावसावर असते. कधी कधी जास्त पाऊस पडला की सगळी कडे नद्या, नाले,धरणे,भरून जातात त्यामुळे त्यावर उपाय योजना ही करावी लागते. कारण उन्हाळ्यात पणेयाची खूप जास्त गरज भाजते त्यामुळे पाण्याचा साठा करून ठेवावे लागते असे केल्याने पाण्याची सोय पुढील येणाऱ्या समस्या साठी वेळेनुसार उपयोगी पडते. “पाणी अडवा पाणी जिरवा “
सगळीकडे हिरवेगार वातावरण होते त्यामुळे बरेच जन या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरायला जातात. रस्ताच्या कडेला असलेली झाडे झुडपे यांच्यामुळे रस्ता एक दम सुंदर दिसतो. निसर्ग रम्य वातावरणात वेगवेगळे प्रकारचे फुले फळे आणि टेकडया चे रुप एकदम देखणीय असते. पाऊस पडला की आभाळात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते. फिरायला गेल्या नंतर छान छान कविता पावसाचे गाणे गात आपण या वातावरणात प्रवास करत असतो.यातून आपल्याला खूप अनुभवायला मिळते. निसर्गाशी संवाद साधायला वेळ भेटतो.
पावसाळ्यात वतातवरणं एकदम थंड आणि आनंदी असते. शेतकरी त्याचे काम करत असतात आकाशातले पक्षी आनंदाने फिरत असतात. प्राण्यांना हिरावा गार चारा मिळतो.त्यामुळे सर्व जनावरांची पोट खाली राहत नाही त्यांना पोट भरून असतात ह्या पावसाळ्यात.पाऊस खूप आवश्यक असतो पण त्याच बरोबर काही अडचणी सुद्धा येत असतात. बऱ्याच वेळा अतिवृष्टी होण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप जास्त नुकसान होते.ह्या महापूरला नदी काठच्या गावकरी लोकाना समोरे जावे लागते. या पूरात घरे, रस्ते, जनावरे वाहून जातात. पावसाळ्यात जास्तीत जास्त प्रमाणात रोगराई पसरते आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. तरी सुद्धा आपल्याला या गोष्टीना सावरत पुढे जावे लागते. कारण प्रत्येक गोष्ट एकमेकाशी संबधित आहे. त्यासाठी पर्याय काढावेच लागते.
पावसामुळे होणारे नुकसान – जेव्हा हा महा भयंकर पुर येतो तेव्हा सगळ्याना सावधान राहावे लागते. कारण एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडणे खूप अवघड असते.पाणी घरात गेले की परिस्थिती जास्त बिघडते कुटूंबतील लहान लहान मुलांचे खूप बेहाल होतात. यातून बाहेर पडण्यासाठी सरकार ची मदतीची गरज असते. पण ते कधीही उशिराच हजर होत असतात. त्यांच्या मदतीने गावकरी लोकांना सुख सोविधा पुरविल्या जात असतात। म्हणून हा पाऊस जितका आवश्यक असतो तितकाच धोकादायक पण असतो. अश्या वेळी आपण आपल्या कुटुंबासोबतच रहावे.
या पावसामुळे येणाऱ्या सर्व अडचणींवर आपण काहीतरी उपाय योजना करायला पाहिजे.शासनाच्या मदतीने जलसाठा व्यवस्थापन, पुराचे नियोजन, रस्त्यांची देखभाल अश्यासर्व समस्या त्याच्या पर्यत पोहचवणे खूप गरजेचे असते.पावसाळ्यात वेवोवेळी doctor चा सल्ला घेणे. आरोग्याकडे लक्ष देणे,स्वच्छतेची काळजी घेणे प्रत्येकाचे काम आहे ते केले पाहजे. प्रशासनाने आणि नागरिकांनी एकत्र येऊन ही सर्व कामे करायला हवे.Pavsala Nibandh in Marathi
पावसाळा म्हणजे आनंद – पावसाळा म्हटला की खूप आनंद होतो पावसात भिजायला गाणी गात नाचायला खूप आडतात. जसे आपणं आनंद घेत असतो तसेच जंगलात सुद्धा प्राणी पक्षी आनंदाने विशेषत: मोर आनंदाने पिसरा फुलवत असतो. हा असा ऋतु आहे जो बऱ्याच जणांना खूप आवडत असतो. या मुळे निसर्गाचे सुंदर रुप पाहायला मिळते. तर आपण अश्या सुंदर निसर्गाने दिलेल्या देणगीची काळजी घेतली पाहिजे.
पावसाळा सुरू झाला की समाजा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते.पावसाळा लागला की सण-उत्सव चालू होतात त्यामुळे मोठ्या आनंदाने सर्व जण एकत्रित येतात आणि हे सण साजरे करतात.त्यामुळे लोकांमधील मतभेद,रूसवे दूर होतात. पाऊस असल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांना आवश्यक ते पाणी मिळते आणि चांगले उत्पन्न होते त्यामुळे त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरून येते. त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळले की के खूप समाधानाने झोप घेऊ शकतात. त्यांच्या साठी शेती च म्हणजे खूप काही असते.
पाऊस न येण्याची करणे – आताच्या काळात झाडाची संख्या खूप कमी झाली आहे जर आपल्याला भरपुर पाऊस पाहिजे असेल तर पाऊस येण्यासाठी आपण वृक्ष तोड थांबवली पाहिजे आणि सर्वानी मिळून एक एक झाड लावले पाहिजे आणि त्या झाडाला मोठे होई पर्यंत त्याची काळजी घेतली पाहिजे. ” झाडे लावा झाडे जगवा ” अश्या मोहीम प्रत्येक गांवोगावी आणि शहरामध्ये चालू करायला पाहिजे झाडाचे किती महत्व आहे हे लोकांपर्यंत पोहचवणे हे आपले कर्तव्य आहे. आणि काळाची गरज सुद्धा. झाडमुळे रस्त्याची शोभा वाढते. सावली भेटते फळे फुले औषधी अश्या बऱ्याच गोष्टी मिळत जे आपल्या साठी खूप आवश्यक असते. म्हणून या सुंदर निसर्गाला जपले पाहिजे तर आपली शान आहे.आणि हेच आपले जगण्याचे मुख्य घटक आहे.
तर आज आपण पावसाळा( Pavsala Nibandh in Marathi )या विषयी छान आणि महत्व पूर्ण पैलू सोबत हा विशेष निबंध लिहलेला आहे. essay on rainy season in marathi, आवडता ऋतु पावसाळा या सर्वाचा समावेश आहे. तर मित्रांनो तुम्ही हा निबंध वाचा आणि तुमच्या शालेय जीवनात म्हणजेच निबंध लेखन उपयुक्त येईल असा हा लेख आहे. आणि तुमच्या पावसाळ्यातल्या गोष्टी आम्हाला शेअर करा. आणि तुमच्या सर्व मित्र मैत्रीणी नक्कीच पाठवा.
अश्याच छान छान निबंध लेखनासाठी आमच्या lekhmarathi.com या वेबसाइट ला भेट द्या….
आणखी हेही वाचा– Mazi Aai Nibandh Marathi | माझी आई निबंध मराठी 300 शब्द
आणखी हेही वाचा –Mazi Shala Nibandh in Marathi | माझी शाळा निबंध