NEFT meaning in Marathi– तर मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण एनइएफटी (NEFT) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. एनइएफटी म्हणजे काय ते कसे काम करते त्यामुळे मिळणारे लाभ कोणते याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तर जाणून घेऊया सोबतच फुल फॉर्म आणि एकटी म्हणजे काय?
NEFT Information In Marathi | NEFT म्हणजे काय ? संपूर्ण माहिती”
NEFT म्हणजे काय ? – तर राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण (NEFT) ही भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे (RBI) सुरू केलेली एक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर प्रणाली आहे. व ही एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे किंवा व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे हस्तांतरित करण्याचे काम करत असते.या प्रणाली मध्ये फंड ट्रान्सफर batch-wise म्हणजेच(गटांमध्ये)केले जाते. NEFT प्रणालीद्वारे भारतातील कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने पाठवले जाऊ शकतात.म्हणूनच NEFT ही प्रणालीद्वारे फंड ट्रान्सफर करणे खूप सुरक्षित, विश्वसनीय आणि सुलभ असते.
तर ही सेवा भारतातील जवळजवळ सर्व बँकांमध्ये उपलब्ध आहे.NEFT द्वारे ग्राहक सहजपणे पैसे पाठवू शकतात, आणि हे प्रामुख्याने इंटरनेट बँकिंग किंवा शाखेतील फॉर्मद्वारे केले जाते.
What Is NEFT Full Form In Marathi
NEFT चा फूल फॉर्म आहे: राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण (National Electronic Funds Transfer). NEFT म्हणजे National Electronic Funds Transfer, एक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर प्रणाली आहे, ज्याद्वारे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.
NEFT चे प्रमुख लाभ | NEFT Charges and Benefits
कोणत्याही रकमेचे हस्तांतरण: आपल्याला या NEFT द्वारे कोणतीही रक्कम हस्तांतर करता येते. बँक टु बँक, आणि एका व्यक्ति कडून दुसऱ्या व्यक्ति कडे पैसे पाठवणे शक्य झाले आहे. या मध्ये आपण कमी रक्कमपासून ते मोठ्या रकमेपर्यंत NEFT ने पैसे पाठवु शकतो.
कोणत्याही ठिकाणी पैसे हस्तांतर: भारतातील सर्व प्रमुख बँका NEFT प्रणालीशी जोडलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही खात्यातून कोणत्याही ठिकाणी पैसे हस्तांतर केले जाऊ शकते. तुम्ही सहज पैशाची देवाण घेवाण करू शकता.
संपूर्ण भारतात वापर: NEFT प्रणाली संपूर्ण भारतात लागू आहे आणि सरकारी तसेच खाजगी बँकांमध्ये उपलब्ध आहे.त्यामुळे तुम्हाला सर्व सोई उपलब्ध झाल्या आहे. तुम्ही कमी पैशा पासून तर जास्त रक्कमे पर्यंत व्यवहार करू शकता.
ऑनलाइन आणि ऑफलाइन सेवा: NEFT साठी इंटरनेट बँकिंग वापरून ऑनलाइन ट्रान्सफर करू शकता किंवा बँकेच्या शाखेत जाऊन NEFT फॉर्म भरून पैसे हस्तांतर करू शकता.ऑनलाइन पद्धतीने तुम्ही तुमचे सर्व व्यवहार अगदी सोप्या पद्धतीने तसेच घरबसल्या पण कामे करू शकता.
प्रक्रिया वेळ: NEFT ट्रान्सफर आता 24×7 उपलब्ध आहे, जे पूर्वी कामकाजाच्या दिवशी ठराविक वेळात होते.म्हणून आता चिंता करण्याची काही गरज राहली नाही आहे.
कमी शुल्क: NEFT द्वारे पैसे पाठवण्यासाठी खूप कमी शुल्क आकारले जाते, काही बँका ऑनलाइन ट्रान्सफरसाठी शुल्कही माफ करतात.तुमच्या खात्यातील पैसे व्यवहार केल्या नंतर कट केले जाणार नाही. तुम्हाला कोणत्याच प्रकारचे चार्जेस लागत नाही.
NEFT कसे कार्य करते?
जर तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन) व्यवहार करायचे असल्यास पैसे पाठवण्याची सूचना ग्राहक बँकेला देतो.
जेव्हा ग्राहक बँक NEFT द्वारे पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करते आणि ट्रान्सफरची माहिती RBI च्या NEFT प्रणालीकडे पाठवत असते. रिझर्व्ह बँक ही माहिती प्राप्त करून ती संबंधित प्राप्तकर्ता बँकेकडे पाठवते.आणि प्राप्तकर्ता बँक तो पैसा संबंधित खात्यावर जमा करते.
NEFT साठी आवश्यक माहिती
NEFT ट्रान्सफर करण्यासाठी खालील माहिती आवश्यक आहे:
प्राप्तकर्ता बँकेचे नाव
प्राप्तकर्ता बँक शाखेचा IFSC कोड
प्राप्तकर्त्याचे खाते क्रमांक
प्राप्तकर्त्याचे नाव
ट्रान्सफरची रक्कम
NEFT द्वारे ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया
- इंटरनेट/मोबाइल बँकिंगमध्ये लॉगिन करा.
- प्राप्तकर्ता जोडा (नाव, खाते क्रमांक, IFSC कोड).
- Fund Transfer पर्यायातून NEFT निवडा.
- रक्कम भरा आणि प्राप्तकर्त्याचे नाव निवडा.
- OTP किंवा सिक्युरिटी पिन वापरून पुष्टी करा.
- ट्रान्सफर पूर्ण करा आणि पुष्टी संदेश मिळवा.
NEFT द्वारे 24×7 पैसे बॅचेसमध्ये सुरक्षितपणे ट्रान्सफर केले जातात.
NEFT द्वारे ऑफलाइन पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया
- बँकेत भेट द्या: जवळच्या बँकेच्या शाखेत जा.
- NEFT फॉर्म भरा: बँकेकडून NEFT फंड ट्रान्सफर फॉर्म घ्या.
- प्राप्तकर्त्याची माहिती भरा: प्राप्तकर्त्याचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, आणि ट्रान्सफर रक्कम योग्य प्रकारे लिहा.
- फॉर्म जमा करा: फॉर्म आणि रक्कम (कॅश किंवा चेक) बँक कर्मचार्यांकडे द्या.
- बँक प्रक्रिया करेल: बँक कर्मचार्यांद्वारे प्रक्रिया सुरू केली जाईल, आणि पैसे बॅचेसमध्ये ट्रान्सफर होतील.
पुष्टी संदेश मिळाल्यावर ट्रान्सफर पूर्ण होईल.
NEFT चा फायदा
सुरक्षितता: पैसे हस्तांतर सुरक्षितरीत्या होतात.
कोणत्याही किमान मर्यादेची अट नाही: कमीत कमी रक्कमेसाठीही हस्तांतर करता येते.
सुलभता: शाखेत जाऊन किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे सहजपणे व्यवहार करता येतो.
कोणतेही कागदी काम नाही: ऑनलाइन बँकिंगमुळे कागदपत्रांची आवश्यकता नाही.
कमी शुल्क: आर्थिक व्यवहारांवर कमी शुल्क आकारले जाते.
NEFT ट्रान्सफरचे शुल्क
बँकांमध्ये व्यवहार करण्यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते, आणि ते रकमेवर अवलंबून असते.
अनेक बँका ऑनलाइन NEFT व्यवहारासाठी शुल्क आकारत नाहीत.
NEFT एक अत्यंत सोयीस्कर, सुरक्षित आणि सुलभ पद्धती आहे, ज्याद्वारे कमी खर्चात आणि कोणत्याही किमान मर्यादेच्या अटीशिवाय पैसे पाठवता येतात.
FAQs : NEFT meaning in Marathi
NEFT ट्रान्सफर करण्यासाठी काय आवश्यक आहे?
उत्तर: प्राप्तकर्त्याचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचा IFSC कोड, आणि ट्रान्सफर करण्याची रक्कम आवश्यक आहे.
1.NEFT चे फायदे काय आहेत?
उत्तर: NEFT सुरक्षित, सोपी, आणि कमी खर्चात फंड ट्रान्सफर करण्याची प्रणाली आहे. यामध्ये कोणत्याही किमान रकमेची अट नाही.
2.NEFT द्वारे कमीतकमी आणि जास्तीत जास्त किती रक्कम ट्रान्सफर करता येते?
उत्तर: NEFT द्वारे कमीतकमी रक्कम ट्रान्सफर करण्याची कोणतीही मर्यादा नाही. जास्तीत जास्त रक्कमेसाठी मात्र बँकेच्या धोरणांवर अवलंबून असते.
3.NEFT ट्रान्सफर पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर: NEFT ट्रान्सफर बॅचेसमध्ये होते, त्यामुळे काही मिनिटांपासून ते 2 तासांपर्यंत वेळ लागू शकतो.
4.NEFT ट्रान्सफर करण्यासाठी कोणते शुल्क लागते?
उत्तर: NEFT ट्रान्सफरसाठी शुल्क रक्कमेवर अवलंबून असते, पण काही बँका ऑनलाइन ट्रान्सफरसाठी शुल्क घेत नाहीत.
5.NEFT चा वापर कोण करू शकतो?
उत्तर: कोणताही बँक खातेदार NEFT प्रणालीचा वापर करून भारतातील कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो.
6.NEFT वापरून पैसे परदेशात ट्रान्सफर करता येतात का?
उत्तर: नाही, NEFT ही सेवा फक्त भारतातील बँकांमध्ये वापरता येते.
7.NEFT ट्रान्सफर अयशस्वी झाला तर काय करावे?
उत्तर: जर NEFT ट्रान्सफर अयशस्वी झाला तर पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला त्याचे पैसे परत मिळतात.
तर अशाप्रकारे आपण NEFT म्हणजे काय (NEFT meaning in Marathi) याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या या लेखांमध्ये बघितली आहे. तुम्हाला पण NEFT म्हणजे काय माहिती नसेल तसेच ते कसे काम करते व त्यासाठी लागणारे कागदपत्रे, त्यावर मिळणारे लाभ याविषयी माहिती सादर केलेली आहे. ही माझी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तसेच हे माहिती तुमच्या -मैत्रिणींना नक्कीच पाठवा.नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर या विषयी माहिती जाणून घेतलेली आहे ही एक अत्यंत सोपी आहे व सुलभ पद्धत आहे ज्याच्या माध्यमातून आपण कमी खर्चात कोणत्याही प्रकारचे देवाणघेवाण व्यवहार करू शकतो.
आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.
आणखी हेही वाचा – IMPS Full Form In Marathi| आयएमपीएस फूल फॉर्म