How To Open Bank Account Online – मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण बघणार आहोत ऑनलाइन बँक खाते कसे उघडायचे. सध्याच्या काळात प्रत्येकाचे बँक खाते असणे खूप आवश्यक आहे. डिजिटल झालेला आहे त्यामुळे सर्व व्यवहार करण्यासाठी व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच स्वतःची व्यवहार करण्यासाठी प्रत्येकाकडे स्वतःचे बँक खाते असणे खूप आवश्यक आहे. आणि हे बँक खाते कसे उघडायचे याबद्दल आपण या लेखकांमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहोत. यामुळे तुमचे व्यवहार सुरक्षित आणि सोयीस्कर होतात व ऑनलाइन पद्धतीने पैशाचे देवाण-घेवाण सोपे आणि सुलभ पद्धतीने होऊ शकतात म्हणून बँक स्वतःचे खाते असणे आवश्यक आहे.
How To Open Bank Account Online | बँक खाते कसे उघडायचे प्रक्रिया
ऑनलाइन बँक खाते उघडणे ही प्रक्रिया आता सोपी आणि सोयीस्कर झाली आहे. तुम्ही बँकेच्या वेबसाइटवर किंवा मोबाइल अॅपद्वारे घरबसल्या खाते उघडू शकता. खालील टप्प्यांमध्ये ऑनलाइन बँक खाते उघडण्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे.
सर्वात आधी तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्रे तयार करावे लागणार त्यानंतर ऑनलाईन खाते उघडण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागतील. तर खाली काही पायऱ्या दिल्या आहेत.
- बँक निवडणे
सर्वप्रथम, तुम्ही कोणत्या बँकेत खाते उघडायचे आहे, ते ठरवा. विविध बँकांच्या सेवा, फी, आणि फायदे तपासून तुमच्या गरजेनुसार योग्य बँक निवडा. काही लोकप्रिय बँका जसे की:
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
HDFC बँक
ICICI बँक
बँक ऑफ बडोदा
Axis बँक
- खाते प्रकार निवडणे
तुमच्या गरजेनुसार योग्य खाते निवडा:
बचत खाते (Savings Account): व्यक्तींना पैसे साठवण्यासाठी उत्तम पर्याय.
चालू खाते (Current Account): व्यवसायिक वापरासाठी.
झिरो बॅलन्स खाते: किमान शिल्लक न ठेवता खाते उघडण्यासाठी.
डिजिटल खाते: पूर्णपणे ऑनलाइन खाते ज्यामध्ये बँकेत जाण्याची गरज नाही.
बँक खाते उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड: ओळख आणि पत्ता पुरावा.
- ओळखीचे पुरावे जसे की पॅन कार्ड ड्रायविंग ओळखपत्र,पासपोर्ट : आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक.
- पत्ता पुरावा : जसे की, मतदान कार्ड
- फोटो: पासपोर्ट आकाराचे फोटोज.
- मोबाइल क्रमांक: OTP प्रक्रिया साठी आवश्यक.
ऑनलाइन बँक खाते उघडण्यासाठी
- बँकेच्या वेबसाइट किंवा अॅपवर जा.
- तुमच्या निवडलेल्या बँकेची अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर जा.
- वेबसाइटवर “Open New Account” किंवा “नवीन खाते उघडा” या लिंकवर क्लिक करा.
- फॉर्म भरणे
- आता ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा, त्यात तुमची सर्व माहिती योग्य प्रकारे भरा:
- तुमचे पूर्ण नाव टाका.
- तुमचा पूर्ण पत्ता टाकणे आवश्यक आहे.
- जन्मतारीख
- संपर्क क्रमांक
- ईमेल आयडी
- पॅन आणि आधार क्रमांक
केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे
KYC साठी आधार OTP आधारित ई-KYC केली जाते.
काही बँका व्हिडिओ केवायसीची सुविधा देखील देतात, ज्यात तुम्हाला एका बँक प्रतिनिधीशी व्हिडिओ कॉलद्वारे ओळख पडताळणी करावी लागते.
खाते क्रमांक आणि इतर तपशील मिळणे.
एकदा तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक, IFSC कोड, पासबुक आणि डेबिट कार्ड संबंधित माहिती ईमेल किंवा SMS द्वारे मिळेल.व पासबुक आणि डेबिट कार्ड, ATM कार्ड आणि चेकबुक तुम्हाला पोस्टाने मिळते. 7-10 दिवसांत हे साधन तुमच्यापर्यंत पोहचते.
नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग सक्रिय करणे
खाते उघडल्यानंतर तुम्ही नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवांसाठी अर्ज करू शकता. यामुळे तुम्ही घरबसल्या आर्थिक व्यवहार करू शकता.
टीप:
अनेक बँका आता फक्त आधार आणि पॅनच्या आधारे खाते उघडण्याची सुविधा देतात.
काही बँकांच्या डिजिटल खात्यांमध्ये शाखेला भेट न देता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करता येते.
काही खात्यांसाठी किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक असू शकते, तर काहीत झिरो बॅलन्स सुविधा देखील मिळते.
या सोप्या टप्प्यांमध्ये तुम्ही घरबसल्या बँक खाते उघडू शकता.
How To Open Bank Account Online FAQs :
1. बँक खाते उघडताना किमान ठेव किती असावी?
उत्तर:प्रत्येक बँकेचे नियम वेगवेगळे असतात. काही बँका “झिरो बॅलन्स” खाते देतात ज्यामध्ये किमान ठेव नसते, तर इतर बँकांमध्ये किमान ठेव ₹500 ते ₹10,000 पर्यंत असू शकते.
2. बँक खाते उघडताना किती वेळ लागतो?
उत्तर:ऑनलाइन अर्ज प्रक्रिया साधारणत: 10-15 मिनिटांत पूर्ण करता येते. खाते उघडल्यानंतर काही तासांतच खाते क्रमांक, IFSC कोड, आणि इंटरनेट बँकिंगची माहिती मिळू शकते.
3. ऑनलाइन बँक खाते उघडण्यासाठी कोणती बँक निवडावी?
उत्तर:
तुमच्या गरजेनुसार बँक निवडावी. जर तुम्हाला झिरो बॅलन्स खाते हवे असेल, तर काही खास बँका हे देतात. तसेच बँकेची शाखा जवळ असल्यास ती निवडणे सोयीचे असते.
4.ऑनलाइन बँक खाते उघडताना OTP का लागतो?
उत्तर:
ऑनलाइन बँक खाते उघडताना तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येतो, ज्यामुळे खात्याचे सत्यापन होते. हा एक सुरक्षा उपाय आहे.
5.ऑनलाइन खाते उघडताना केवायसी (KYC) पूर्ण करणे आवश्यक आहे का?
उत्तर: होय, KYC (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्हाला आधार आणि पॅन कार्डद्वारे KYC व्हेरिफिकेशन करावे लागते.
तर अशाप्रकारे आपण (How To Open Bank Account Online )ऑनलाइन बँक खाते कसे उघडायचे याबद्दल संपूर्ण माहिती या लेखांमध्ये बघितली आहे ही माहिती तुम्हाला अत्यंत उपयोगी पडेल. व तुमचेही बँक खाते नसल्यास तुम्हाला नवीन बँक खाते ओपन करण्यास मदत करेल. ही पद्धत तुम्हाला अत्यंत सोपी आणि सोयस्कर पद्धतीने सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला कोणतेही प्रकारची अडचण येणार नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आलास आम्हाला कमेंट करून कळवावे.
जर तुम्हाला (ऑनलाइन बँक खाते कसे उघडायचे )बद्दल अधिक प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये प्रश्न विचारू शकता.. आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.