GST Full Form In Marathi – मित्रानों आजच्या लेखात आपण जीएसटी (GST) चा फुल फॉर्म आणि जीएसटी म्हणजे काय याबद्दल जाणून घेणार आहोत.त्यासोबत भारतातील कर याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. जीएसटी चे फायदे , जीएसटीचे नियम, GST Information In Marathi तर चला, जीएसटी बद्दल जाणून घेऊया ..जीएसटी बद्दल माहिती असते आजच्या युगात खूप आवश्यक आहे.
GST Full Form In Marathi
जीएसटी (GST ) मराठी मध्ये “वस्तू आणि सेवा कर” असा अर्थ होतो. वस्तु किंवा सेवेची खरेदी केल्यावर जो कर भरला जातो त्याला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात उदारणार्थ, स्मार्टफोन इत्यादि ..
GST Full Form चा फूल फॉर्म – ‘Goods And Services Tax’
वस्तू व सेवा कर दिनांक 1 जुलै 2017 पासून 0%, 5 % ,12% ,व 28% असे कर दर ठरविण्यात आले. देशभरात वस्तू आणि सेवाच्या विक्रीवर एकच कर लागू करण्यात आला. विविध प्रकारचे कर एकत्र करून एकच कर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रणाली अधिक पारदर्शकपणे पार पाडले जाते.भारतामध्ये सर्वोच्च जीएसटी दर 28 % टक्के आहे.
जीएसटी (GST ) चे फायदे
संपूर्ण देशात वेगवेगळा कर रद्द करून एकच कर लागू करण्यात आला.
देशाच्या विकासासाठी किंवा देश चालवण्यासाठी सरकारने संपूर्ण देशामध्ये एकसारखा कर लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याला जीएसटी असे नाव देण्यात आले. जीएसटी लागू करण्याचा निर्णय संघराज्य व राज्य शासनाने घेतला.
परंतु त्यासाठी राज्यघटनेत काही बदल करण्याची गरज होती म्हणून राज्य सरकारने काही बदल करून विधेयक लोकसभेकडे पाठवण्यात आले.
दिनांक 8 ऑगस्ट 1916 रोजी लोकसभेने कर मान्य केले. भारतातील १९१७ ला वस्तू व कर सेवा लागू करण्यात आला .
देशात कुठेही भेदभाव न करता एक समान कर असावा असा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा उद्देश होता.
त्यासाठी पूर्वी जे कर लागू होते ते कर रद्द करून जीएसटी लागू करण्यात आली.
वस्तू व कर सेवा लागू करण्यासाठी राज्यघटनेत 122 वी घटना दुरुस्ती करून नवीन कायदे लागू करण्यात आले.
जीएसटीचे (GST ) नियम
जीएसटी – वस्तू आणि सेवा कर
जीएसटीचे नियमानुसार 21 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली जम्मू आणि कश्मीर सोडून भारताच्या सर्व राज्याकडून आणि संघशासित प्रदेशाकडून जीएसटी मंजूर करण्यात आले होते. जीएसटी मध्ये उत्पादन शुल्क, व्यवसाय कर, मूल्य वंचित कर, अन्न कर, विक्री कर, परिचय कर, करमाणुक कर, प्रवेश कर, खरेदी कर ,चैनीच्या वस्तू कर आणि जाहिरात कर इत्यादी कर गोळा केला जातो.GST Full Form In Marathi
जीएसटी (GST ) चे प्रकार
देशाला वाचविण्यासाठी देशात महसूल गोळा करण्यासाठी असे मुख्य जीएसटी चे तीन प्रकार करण्यात आले आहे. जेणेकरून संघराज्य व राज्यांमध्ये वाद निर्माण होणार नाही आणि चांगल्या रीतीने कर गोळा करू शकेल.
- (CGST) केंद्रीय वस्तू आणि सेवा कर – या मध्ये संघराज्य कर जमा करतो
- (SGST) राज्य वस्तू आणि सेवा कर– यामध्ये कर जमा करण्यासाठी करण्याची जबाबदारी राज्याची असते आणि संघराज्य हस्तक्षेप करत नाहीत.
- (IGST) एकात्मिक वस्तू आणि सेवा कर– यामध्ये संघराज्य कर गोळा करतो परंतु नंतर ते राज्यांमध्ये डिस्ट्रिबूट केले जाते.
जीएसटी (GST ) चे दर
जीएसटी (GST ) चे वस्तू आणि सेवा वरुण दर ठरवले जातात.
0% (शून्य टक्के GST) : शून्य टक्के दर हा फळे, भाज्या, दूध, आणि शैक्षणिक सेवांसाठी लागू होतो.
5% (पाच टक्के GST) अन्नधान्य, जीवनात आवश्यक औषधे, बजेट, हॉटेल्स मध्ये राहण्यासाठी दर लागू होतो.
12% (बारा टक्के GST) : इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी जसे की, रेफ्रिजरेटर आणि तयार केलेले खाद्यपदार्थ दर लागू होतो.
18% (अठरा टक्के GST): बराच सामान्य वस्तू आणि सेवांसाठी जसे की एसी, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मधील सेवा स्मार्टफोन यासाठी हा तर लागू होतो.
28% (आठाविस टक्के GST): उच्च दर्जाच्या वस्तू आणि सेवांसाठी जसे की, लक्झरी कार, एसी हॉटेल, आणि काही तंबाखू उत्पादने यासाठी दर लागते.
GST भरण्याची वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
मासिक GST रिटर्न्स –
- जर करदाता व्यापारी हा लहान असेल तर त्याला जीएसटी की मासिक पणे किंवा त्रीमासिकपणे भरावी लागते. या मासिक रिटर्न्स मध्ये व्यापाराने केलेल्या विक्रीचा तपशील सादर करावा लागतो.
- महिन्याच्या अकरा तारखेपर्यंत किंवा त्रीमासिक पद्धतीने भरणाऱ्या कर दात्याला त्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत. जीएसटी भरण्याची मुदत असते.
वार्षिक GST रिटर्न
- हा जीएसटी रिटर्न्स आर्थिक वर्ष संपल्यानंतर एकदा भरावा लागतो, यामध्ये संपूर्ण वर्षभरात केलेली विक्री, खरेदी, आणि भरलेल्या करायची माहिती दिली जाते.
- हा जीएसटी रिटर्न वर्ष संपल्यानंतर पुढच्या वर्षाच्या 31 डिसेंबर पर्यंत भरता येते.
क्वार्टरली रिटर्न्स (Quarterly Return Monthly Payment)
- छोटे व्यापारी व ज्यांचा वार्षिक टर्नओव्हर ₹5 कोटींपेक्षा कमी आहे, असे QRMP (Quarterly Return Monthly Payment) या योजनेअंतर्गत, करदाता तिमाही आधारावर GSTR-1 रिटर्न दाखल करू शकतो आणि हा मासिक कर भरणे आवश्यक आहे.
GST Full Form In Marathi FAQs:
१. GST चा पूर्ण अर्थ काय आहे?
GST चा पूर्ण अर्थ माल व सेवा कर (Goods and Services Tax) आहे. हा एक अप्रत्यक्ष कर आहे जो वस्तू आणि सेवांवर लावला जातो.
२. GST लागू होण्याचे उद्दीष्ट काय आहे?
GST चा उद्दीष्ट एकच कर प्रणाली आणणे आहे, ज्यामुळे केंद्र आणि राज्यस्तरीय करांचा गोंधळ दूर होईल आणि भारतातील कर व्यवस्था सोपी होईल.
३. GST चे मुख्य प्रकार कोणते आहेत?
GST चे तीन मुख्य प्रकार आहेत:
CGST: केंद्रीय वस्तू आणि सेवा कर
SGST: राज्य वस्तू आणि सेवा कर
IGST: आंतरराज्य वस्तू आणि सेवा कर
४. GST नोंदणी कोणासाठी आवश्यक आहे?
त्याच्यापेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी GST नोंदणी आवश्यक आहे:
सेवांसाठी: ₹20 लाख
वस्तूंसाठी: ₹40 लाख
५. GST चे फायदे काय आहेत?
GST चे काही प्रमुख फायदे असे आहेत:
कर प्रणाली सुलभ आणि पारदर्शक बनवणे
कराच्या ओझ्याचे समान वाटप
व्यवसायांना विविध करातून सूट
तर अशाप्रकारे आपण आजच्या लेखांमध्ये (GST Full Form In Marathi ) GST म्हणजे काय, GST मुळे होणारे फायदे, आणि नियम , GST चे प्रकार या बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. जर तुमच्यापैकी कोणाला GST बद्दल माहिती नसेल तर हा लेख तुम्ही नक्की त्यांच्यापर्यंत पोचवावा.आणि आशा आहे की तुम्हाला GST म्हणजे काय आणि GST का भरावा लागतो. GST भरताना कोणती काळजी कशी घ्यावी. याबद्दल चांगले समजले असेल.. जर तुम्हाला याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच प्रश्न विचारू शकता..
आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.
आणखी हेही वाचा – What Is OTP Full Form In Marathi | OTP काय आहे ?
आणखी हेही वाचा – DBT Full Form And Meaning | डीबीटी फूल फॉर्म