BCCI Full Form in Marathi | बीसीसीआय म्हणजे काय?

BCCI Full Form in Marathi– जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय क्रिकेट बोर्ड. बीसीसीआय ही एक भारतीय क्रिकेटची मुख्य प्रशासकीय संस्था आहे. ही संस्था क्रिकेटच्या विविध स्पर्धा आयोजित करत असतात. तर आजच्या लेखांमध्ये आपण बीसीसीआय चा फुल फॉर्म, बीसीसीआय म्हणजे काय, बीसीसीआय उद्दिष्टे, आणि आयोजित केलेल्या स्पर्धा इत्यादी गोष्टी आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

BCCI Full Form in Marathi | BCCI Long Form in Marathi

BCCI Full Form in Marathi
BCCI Full Form in Marathi

BCCI ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असे मराठी मध्ये म्हणतात. तर बीसीसीआय चा Full Form (Board of Control for Cricket in India – BCCI) असा आहे. ही एक राष्ट्रीय क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. ही संस्था भारतीय क्रिकेटरचे व्यवस्थापन आणि संचालन करत असते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे भारतातील देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटचे वेळापत्रक, मंजुरी देण्याचे काम करते.

बीसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. त्यामध्ये पुरुषांचा राष्ट्रीय क्रिकेट संघ, महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, पुरुषांचा राष्ट्रीय अंडर -19 क्रिकेट संघ, आणि महिलांचा राष्ट्रीय अंडर 19 क्रिकेट संघ असतात.

तर भारत या संघाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळते आणि मंडळ त्या संघाचे नियोजन व आयोजन सांभाळत असते बीसीसीआय हे भारतामधील आणि बाहेर येईल सर्व स्पर्धांचे प्रभारी आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू पंच व अधिकारी निवडण्याचा अधिकार आहे .

राज्य क्रिकेट संघाचे प्रतिनिधी हे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची निवड करत असते. आणि बीसीसीआयचे नेतृत्व हे अध्यक्ष करत असतात. अध्यक्षाचे सर्वोच्च स्थान संघटनेत असते.

What is BCCI in Marathi| बीसीसीआय म्हणजे काय ?

BCCI – Board of Control for Cricket in India भारतीय क्रिकेट नियामक मंडळ.

  • आरई ग्रँट गोवन हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे पहिले अध्यक्ष होते.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याचे मुख्यालय चर्चगेट मुंबई वानखेडे स्टेडियम येथे आहे.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत संघटन बोर्ड आहे.
  • बीसीसीएची स्थापना एक डिसेंबर 1928 मद्रासच्या अधिनियम वरून करण्यात आली होती.
  • त्यानंतर तामिळनाडू सोसायटीचा कायदा 1975 च्या अंतर्गत पुनर नोंदणी करण्यात आली.
  • या संस्थेला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून कोणतेही अनुदान देण्यात येत नाही.
  • BCCI ह्या संस्थेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप मोठा प्रभाव आहे.
  • IPL(आयपीएल ) ही (BCCI) बीसीसीआय द्वारे चालवली जाते, त्यामुळे ही जगातली सर्वात श्रीमंत क्रीडा लीग आहे.
  • ₹ 4,298 कोटी (US$510 दशलक्ष) BCCI ने 2022-23 या वर्षी कर भरले.
  • BCCI ने ₹ 18,700 कोटी (US$2.2 बिलियन) वर्ष 2023-2024 मध्ये कमावले आहे.
  • गौतम गंभीर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक होत. तर महिला प्रशिक्षक अमोल मुजुमदार हे होते.
  • बीसीसीआयचा लोगो स्टार ऑफ इंडिया या चिन्हावरून तयार केला आहे.
  • बीसीसीआय च्या logo ची रचना भारत सरकारने 1928 मध्ये केली.
  • इ. स. 1980 ते 1990 च्या दशकात, BCCI ने भारतीय क्रिकेट संघाचे सामने प्रसारित करणे चालू केले होते. त्या साठी दूरदर्शनला प्रति सामना ₹ 5 लाख दिले आहे.

BCCI द्वारे आयोजित क्रिकेट स्पर्धा

  • इंडियन प्रीमियर लीग (IPL)
  • बीसीसीआय कॉर्पोरेट ट्रॉफी
  • इराणी कप
  • रणजी करंडक
  • दिलीप ट्रॉफी
  • विजय हजारे ट्रॉफी
  • देवधर करंडक
  • सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
  • एनकेपी साळवे चॅलेंजर ट्रॉफी
  • कर्नल सी के नायडू ट्रॉफी
  • वरिष्ठ महिला T २० ट्रॉफी
  • कूचबिहार ट्रॉफी
  • विनू मांकड ट्रॉफी
  • १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय करंडक
  • १९ वर्षांखालील महिला वन डी चॅलेंजर ट्रॉफी

आणखी हेही वाचा – DBT Full Form And Meaning | डीबीटी फूल फॉर्म

BCCI मुख्य उद्दिष्टे

  • भारतीय क्रिकेटच्या सर्व स्तरांवर व्यवस्थापन, नियोजन, आणि समन्वय साधणे
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनांशी संपर्क साधणे.
  • संघटनात्मक संरचना स्थापन करणे.
  • क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणे.

BCCI ने आयोजित केलेले क्रिकेट विश्वचषके

  • 2026 T20 विश्वचषक
  • 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी
  • 2031 क्रिकेट विश्वचषक
  • 2025 महिला क्रिकेट विश्वचषक

तर आपण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चा फूल फॉर्म जाणून घेतला आहे. आणि बीसीसीआय ची कामे, आयोजीत स्पर्धा, या विषयी आपण बरीच माहिती बघितली आहे. आशा आहे की तुम्हाला बीसीसीआय म्हणजे काय चांगलेच समजले असेल. तुम्हाला आवश्यक अशी माहीती मिळाली असेल तर हा लेख नक्कीच तुमच्या मित्र मैत्रीणी ला पाठवा.

आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.

आणखी हेही वाचा – What Is The full Meaning Of a.t.m | ATM Full Form

आणखी हेही वाचा- NPCI Full Form in Marathi | एनपीसीआय म्हणजे काय ?

FAQs Question :

बीसीसीआय चा फूल फॉर्म काय आहे?

Board of Control for Cricket in India

बीसीसीआय ला मराठी मध्ये काय म्हणतात?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ

BCCI वेबसाइट लिंक कोणती ?

BCCI चे मुख्यालय कुठे आहे

महाराष्ट्र, मुंबई येथील वानखेडे मैदान

BCCI ची स्थापना कधी झाली ?

1928 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ स्थापना झाली .

Sharing Is Caring:

Leave a Comment