Mazi Shala Nibandh in Marathi| माझी शाळा निबंध

Mazi Shala Nibandh in Marathi – शाळा ही आयुष्याची गुरुकिल्ली असते. शाळा शिकायची ईच्या असून सुद्धा गरीब परिस्थिति आपल्याला न शिकण्याला भाग पाडते. पण आपलं शाळेवरचं ते प्रेम शाळेची आवड,मित्रांची ती साथ आणि सरांच असलेला विद्याऱ्थ्यावरचा विश्वास कधीच विसरू शकत नाही. कायम लक्षात असतात त्या आठवणी आणि शाळेतील मज्जा. माझी आदर्श शाळा निबंध मराठी (Mazi Shala Nibandh in Marathi)

माझी सुंदर आदर्श शाळा | Mazi Shala Nibandh in Marathi | ५००+ शब्दांत माझी शाळा निबंध |Essay on Mazi Shala Marathi

माझी शाळा ही माझ्या आयुष्यातली एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. प्रत्येक मुलांना’ घडवण्यासाठी व चांगल वळण लावण्यासाठी जेवढा प्रयत्न आपले आई बाबा करत असतात ठेवढंच आपले शिक्षक सुद्धा आपल्याला शिकवतात वळण लावतात चांगले मार्गदर्शन करत असतात.माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा भारी असे आहे. माझी शाळा ही गावापासून 1 किलो मीटर अंतरावर आहे.त्यामुळे मी माझ्या काही मित्रांसोबत हसत-खेळत, गमती-जमती करत चालतच शाळेला जात असते.

माझी शाळे ची इमारत ही खूप जुनी आहे पण ती खूप काळा आधी पासूनची एक सुंदर शाळा आहे. आणि शाळेचे सर्व वर्ग आणि ऑफिस अजूनही अतिशय सुंदर विचारांनी रंगवलेली आहे .माझ्या शाळेचा परिसर हा स्वच आणि सुंदर आहे शाळेच्या रस्ताने छान छान सावली देणारे झाडे लावली आहे. शाळेत खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी आहे. शाळेत एकूण 1 ते 10 वर्ग आहे. शाळेच्या भिंती या वेगवेगळ्या सुविचाराने आणि रांगेबेरंगी चित्रांनी छान पैकी सजवून आहे.तसेच माझ्या शाळेत विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्या की वह्या पुस्तके, गणवेश आणि दुपारचे जेवण शाळे तर्फेच दिले जाते. जेवणात छान खिचडी आणि कढी असते. प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळ वेगळ जेवण मिळत. Mazi Shala Nibandh in Marathi

माझी शाळा ही डिजिटल शाळा म्हणून ओळखली जाते. शाळेत Computer lab सर्व विदहयार्थी साथी उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक वर्गाचे नियमित पणे तासीका होतात. आणि शाळेत सर्व नियम पाळावे लागते.शाळेचे नियम टिकवून ठेवण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, इतर कर्मचारी आणि पालक वर्ग सर्वजण मिळून प्रयत्न करतात. माझ्या शाळेच्या दिवसाची सुरुवात ही सुंदर प्रार्थनेपासून होते. आम्ही सगळे वर्गा वर्गातून रांगेने मधल्या हॉल मध्ये जमतो. सरस्वती माता वंदने नंतर ओंकार आणि गायत्री मंत्र म्हंटला जातो. त्यानंतर माझ्या शाळेत रोज परिपाठ होतो त्यात सुविचार, दिनविशेष,कथा, इत्यादि गोष्टी असतात.

त्या नंतर प्रत्येक वर्गाच्या तासीका सुरू होतात. दुपार नंतर वेळेत सगळे जण मिळून खेळण्यासाठी मैदात उतरतात खो खो ,कबबडी ,लंगडी, असे अनेक खेळ खेळतात आणि त्यात सहभाग घेतला जातो आणि स्पर्धेसाठी दुसऱ्या शाळेत सुद्धा जात असतात. माझ्या शाळेतील वातावरण नेहमी आनंदी व उत्साहाचे ,आणि शिकण्यात मज्जा येण्यासारखे असते. माझे शिक्षक स्वभावाने खूप प्रेमळ व काळजी घेणारे आहे त्याच बरोबर ते खूप strik पण आहे. शाळेच नियम पाळले नाहीतर ते खूप कठीण शिक्षा देतात त्यामुळे आम्ही सगळे नियमित शाळेचे नियमांचे पालन करत असतो. त्यामुळे आमचे शिक्षक आमच्या साठी वेगवेगळ्या शिकवण पद्धती आणि शैक्षणिक साधने आमच्या साथी उपलब्ध करत असतात त्यामुळे आम्हाला शिकायला खूप मज्जा येते आणि आवडते व लक्षात पण राहते. (Mazi Shala Nibandh in Marathi)

शाळेत एक मोठे पुस्तकांचे ग्रंथालय आहे. आणि एक मोठे सभागृह आहे.तिथे विविध प्रकारे कार्यकम आयोजित केले जाते.आमच्या शाळेत कोणतेही उपक्रम असले की आम्हाला खूप मज्जा येते. विशेष म्हणजे 26 जानेवारी आणि ऑगस्ट 15 हा दिवस आमच्या साठी खूप आठवणीचा आहे. हे खास दिवस साजरे करण्यासाठी शाळेत dance, singing, acting, speech eassy ची तयारी चालू असते. या कार्यक्रमात आम्ही सगळे आनंदाने भाग घेतो आणि हा दिवस मोट्या उत्साहाने साजरा करत असतो. तसेच शिक्षक दिवस पण आम्ही मस्त पण साजरा करत असतो त्या दिवशी आम्ही शिक्षिका बनून वर्गाला शिकवणी करत असतो.त्यामुळे माझ्या शाळेत उत्साहाचे वातावरण नेहमीच असते.माझे मित्र आणि मैत्रिणी आम्ही सगळे जण दररोज शाळेत जात असतो. कधी मला घरी राहवस वाटलच नाही.

माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय कांबळे मॅडम आहे त्या अतिशय प्रेमळ त्याबरोबर खूप strik पण आहे त्याच शाळेचा मुख्य पाया आहे. त्यांच्यामुळे शाळेतील सगळे नियम अतिशय् योग्य पद्धतीने पाळले जातात. ते नेहमी आमच्या वर्गावर येऊन आम्हाला छान गोष्टी सांगत असतात. पण त्या वर्गात आल्यावर सर्वाना कडक नियमांचे खूप पालन करावे लागते कारण आमच्या कांबळे मॅडम यांना बेशिस्तपणा आजिबात पसंद नाही. त्यांनी आम्हाला बरेच वेळा शिक्षा देखील केली आहे. शाळेतील इतर शिक्षक देखील खूपच चांगले आहेत. त्यांनी शाळेच्या सुख सोयीचा विचार करून शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबवले आहे. मुलांना चांगले वळण आणि मार्गदर्शन कसे देता येईल यासाठी नेहमी त्या विचार करत असतात.

आमच्या शाळेत शिक्षण सोबतच इतर चांगल्या गोष्टी सुद्धा शिकवतात जस की वृक्षारोपण , पाणी अडवा पाणी जिरवा असे निसर्गा संबधित काही कार्यक्रम नेहमीच चालू असतात. तसेच माझ्या शाळेमध्ये विविध सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी साजरे केले जातात. यामुळे आम्हाला आमच्या परंपरा आणि संस्कृती यांच्याविषयी माहिती होते. शाळेत मोठे मैदान असल्यामुळे आम्ही सगळे जण तेथे आम्ही क्रिकेट, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल असे वेगवेगळे अनेक खेळ खेळतो. शाळेत विविध खेळांची अनेक साधने आहेत. आणि मूलमुली प्रत्येक शाळेतील आणि शाळे बाहेरच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात व प्रथम क्रमाकांवर नंबर पटकावतो त्यामुळे जिकडे तिकडे माझ्या शाळेचे नाव घेतात. (mazi shala marathi nibandh in marathi )

माझे शिक्षक – माझे सर्व शिक्षक आणि शिक्षका अतिशय छान आहे. आज आपण जे काही आहे ते फक्त त्यांच्या मुळेच कारण त्यांनी शिक्षणाबरोबरच आम्हाला इतर गोष्टीच चांगल्या पद्धतीने वळण लावले आणि मार्गदर्शन सुद्धा ते देत असतात. ते आमच्या सोबत एक मित्र परिवारा सारखे राहतात, खेळतात, आणि आम्हासाठी नेहमी काहीतरी वेगळ करण्याचा प्रयत्न करतात. माझे आवडते जोशी सर ते मला नेहमीच सपोर्ट करत असतात. त्यांच्या मुळे मी आज प्रत्येक स्पर्धेत सहभाग घेते. आणि आंतरशालेय, जिल्हा स्तरीय ,राज्य स्तरीय पर्यंत मी जावू शकली आहे त्यांच्यामुळे माझ्यात खूप जास्त आत्मविश्वास वाढला.मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या.

माझी शाळा व शाळेतील शाळेतील सर्व शिक्षक वर्ग प्रत्येक मुलांवर नजर ठेवून विद्यार्थ्यांना निवडते आणि त्यांना घडवते. त्यामुळे माझी शाळा ही उत्तम गुणी मुलांची खाण आहे. आमच्या शाळेतील काही ठराविक बरीच मुले आज आपल्या देशाचे भवितव्य घडवत आहे.ते अशा आमच्या प्रिय द्रोणाचार्य शिक्षकांमुळेच!मी आणि माझे मित्र आम्ही सगळे जण खुशीत रोज शाळेत आनंदाने जातो(माझी आदर्श शाळा निबंध मराठी) माझे शिक्षक माझे उत्तम प्रेरणास्थान आहेत. त्यांनी स्वच्छता, शिस्त आणि चांगल्या सवयींचे महत्व शिकवतात. शाळा संपल्यानंतरही आमचे शिक्षक आम्हाला मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतात. mazi shala nibandh in marathi

माझ्या शाळेने मला खूप काही दिले आहे. आई वडीलां बरोबर माझ्या शाळेने मला खूप सारे संस्कार मिळाले आहेत. मला एक आदर्श नागरिक कसा असतो आणि कसा असायला पाहिजे, हे मी याच शाळेतून शिकलो. शाळेतील अनेक सुंदर सुंदर अनुभव माझ्या मनात साठवले आहेत. माझी शाळा मला खूप आवडते आणि ती माझ्यासाठी नेहमीच आदर्श असेल. दरवर्षी आम्हाला शाळेकडून वेगवेगळ्या शैक्षणिक सहलीला घेऊन जातात . आम्ही आत्तापर्यंत खूप सारे एतीहासिक किल्ले, संग्रहालये, प्राणी उद्यान व निसर्गरम्य ठिकाणी सहली गेलेलो आहेत. या सहलींमुळे आम्हाला छान छान आठवणी मनात जपून ठेवण्यासारख्या तयार झाल्या आहे .

तसेच पुस्तकांमध्ये वाचलेल्या काही गोष्टी आम्हा ला प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळत असते. या दारवर्षीच्या शैक्षणिक सहलींच्यामुळेच आम्हाला इतिहास, निसर्ग आणि संस्कृती यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यास मदत होते. mazi shala nibandh in marathi माझ्या शाळेच्या आठवणी या कधी न विसरता येणार आहे आज मी माझ्या गावाच्या शाळेतूनच माझे सगळ शिक्षण पूर्ण करत आहे. माझ्या मते शाळेचे दिवस अविस्मरणीय आहे ते कधीही विसरता येणार नाही. आणि गावातून घेतलेल्या शिक्षणाला कधी कमी समजू नका. आज गावातील बरेच विद्यार्थी मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहे.

mazi shala nibandh in marathi

सकाळची दररोजची प्रार्थना दुपारनंतरचा भात म्हणजे माझी शाळा
पाठीवरची शाळेची बाग व अंगात पांढरा शुभ्र गणवेश म्हणजे माझी शाळा
प्रत्येक विषयात एक नवीन अर्थ दडलेला म्हणजे माझी शाळा
गणिताच्या शिक्षकाच्या हाताची जोरदार छडी म्हणजे शाळा

नव नवीन गोष्टीतून अर्थपूर्ण मार्गदर्शन म्हणजे माझी शाळा
असंख्य स्वप्न दाखवून आकाशात उडायला मदत म्हणजे शाळा
आयुष्यात प्रत्येक वळणावरच रात्रीच्या वेळी पाहलेलं स्वप्न म्हणजे शाळा
अशी माझी सुंदर आणि आदर्श शाळा, अशी माझी सुंदर आणि आदर्श शाळा !

सारे मिळून शाळेत जाऊया !!!संगळ्याना आयुष्याच्या प्रगतीकडे पुढे नेऊया!!!

मनात ठेवून जिद्द आणि चिकाटी कोणतीही काम शक्य होते भाषा शिकायची असेल
प्रयत्न करत रहावं लागते तर विचार मनात चांगले लागते
आज माझ्या शाळेचा म्हणजे झेडपी चा विद्यार्थी दिप

आज आपल्याच शाळेचा विद्यार्थी झाला शाळेला शिकवायला शिक्षक म्हणून आला
थोडा वेळ तर लागतोच रोपट्याचं वटवृक्ष व्हायला !!

आजच्या या लेखात आम्ही माझी आदर्श शाळा निबंध  माझी सुंदर आदर्श शाळा Mazi Shala Nibandh in Marathi या विषयी माझे विचार आणी माझी शाळा या बद्दल वाचायला तुम्हाला आवडले असेल तर तुमच्या शाळेतील मित्र मैत्रीण नक्कीच पाठवा.
धन्यवाद!

आणखी हेही वाचा – Maza Avadta Chand Essay in Marathi | माझा आवडता छंद क्रिकेट

आणखी हेही वाचा – Mazi Bharat Bhumi Nibandh in Marathi |माझा देश माझी भारतभूमी निबंध

आणखी हेही वाचा – Chatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज निबंध

आणखी हेही वाचा – फुलाचे सुंदर मनोगत/आत्मकथा निबंध | Fulanchi Atmakatha in Marathi Essay

Sharing Is Caring:

Leave a Comment