Difference Between Debit Card and Credit Card | क्रेडिट/डेबिट कार्ड म्हणजे काय?

Difference Between Debit Card and Credit Card- मित्रांनो, आजच्या लेखात आपण  लेखात क्रेडिट/डेबिट कार्ड म्हणजे काय? या दोघामधील फरक काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. क्रेडिट/डेबिट कार्ड च्या सोयी मुळे सर्व व्यवहार पद्धतीने खूप सोप्या झाल्या आहेत. म्हणून आपल्याला क्रेडिट/डेबिट कार्डचा वापर कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.  तर जाणून घेऊया क्रेडिट/डेबिट कार्ड म्हणजे काय? क्रेडिट/डेबिट कार्ड वापरण्याची प्रक्रिया, क्रेडिट कार्डचे फायदे, डेबिट कार्ड फायदे, सर्व काही सविस्तरपणे.

Difference Between Debit Card and Credit Card | क्रेडिट/डेबिट कार्ड म्हणजे काय ?

  • क्रेडिट कार्ड: हे कार्ड बँक तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात देते. तुम्ही हे कार्ड वापरून खरेदी करू शकता आणि नंतर ठरलेल्या तारखेला रक्कम परतफेड करावी लागते. जर वेळेवर परतफेड केली नाही, तर व्याज आकारले जाते.म्हणून  वेळेवर परतफेड करणे खूप आवश्यक असते.
  • डेबिट कार्ड: हे कार्ड बँकेने दिलेल्या बचत खात्याशी जोडलेले असते. तुमच्या खात्यातील रक्कम वापरून तुम्ही त्वरित पेमेंट करू शकता. कर्ज न घेता तुमच्या खात्यातील उपलब्ध रक्कम वापरून लगेच पेमेंट करता येते.

क्रेडिट/डेबिट कार्ड वापरण्याचे ठिकाणे:

  1. ऑनलाईन खरेदी करण्यासाठी जसे की, जसे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, किंवा इतर शॉपिंग साइट्स. ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे इत्यादि.

२. दुकानात किंवा मॉलमध्ये पेमेंटसाठी जसे की, दुकानात काही वस्तु खरेदी केल्यास  आपण ऑनलाइन पेमेंट करू शकतो.

    ३. ATM मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी जसे की, सर्वात सोपी पद्धत म्हणजे  गरज पडल्यास ATM मशीन मधून पैसे काढू शकतो.

      क्रेडिट/डेबिट कार्ड वापरण्याची प्रक्रिया | How to Use Credit and Debit Card

      १. दुकान किंवा मॉलमध्ये क्रेडिट/डेबिट कार्डचा वापर:

      1. वस्तू निवडा: खरेदी करायच्या वस्तू निवडा.
      2. पेमेंट काउंटरवर जा: वस्तू घेऊन पेमेंट करण्यासाठी काउंटरवर जा.
      3. कार्ड द्या: तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड कॅशियरला द्या किंवा तुम्ही POS (Point of Sale) मशीनमध्ये घाला.
      4. पिन टाका: तुमच्या कार्डाचा 4-अंकी गुप्त पिन क्रमांक टाका.
      5. लेन-देन पूर्ण करा: पिन टाकल्यावर तुमच्या खात्यातून रक्कम कपात होते आणि पेमेंट पूर्ण होते.

      २. ऑनलाईन खरेदीसाठी क्रेडिट/डेबिट कार्डचा वापर:

      1. वेबसाईट किंवा अ‍ॅपवर जा: जिथून खरेदी करायची आहे ती वेबसाइट किंवा अ‍ॅप उघडा.
      2. वस्तू निवडा: खरेदीसाठी वस्तू निवडा आणि ‘कार्ट’ मध्ये जोडा.
      3. चेकआउट करा: पेमेंट करण्यासाठी ‘चेकआउट’ पर्यायावर क्लिक करा.
      4. पेमेंट पद्धत निवडा: “Credit/Debit Card” पर्याय निवडा.
      5. कार्डची माहिती भरा:
        • कार्ड क्रमांक (16-अंकी क्रमांक)
        • वैधता तारीख (Expiry Date)
        • CVV (3-अंकी सुरक्षा कोड, कार्डच्या मागे)
      6. OTP किंवा पिन टाका: मोबाइलवर आलेला OTP (One Time Password) किंवा पिन टाका.
      7. लेन-देन पूर्ण करा: OTP टाकून पेमेंट पूर्ण करा.

      ३. ATM मध्ये क्रेडिट/डेबिट कार्डचा वापर:

      1. कार्ड घाला: तुमचे कार्ड ATM मशीनमध्ये घाला.
      2. पिन टाका: 4-अंकी गुप्त पिन क्रमांक टाका.
      3. ऑपरेशन निवडा: पैसे काढणे, बॅलन्स तपासणे, इ. पर्याय निवडा.
      4. रक्कम टाका: पैसे काढायचे असल्यास इच्छित रक्कम टाका.
      5. लेन-देन पूर्ण करा: पैसे घ्या आणि पावती मिळवा.

      क्रेडिट/डेबिट कार्ड वापरताना घ्यायची काळजी

      1. पिन गुप्त ठेवा: मिंत्रानो तुमचा पिन कोणालाही सांगू नका.तुमच्या पिन ची सुरक्षीतता ठेवणे अत्यंत आवश्यक असते.
      2. सतर्क राहा: कोणत्याही अज्ञात किंवा संशयास्पद वेबसाईटवर कार्डची माहिती देऊ नका. नेहमी सावधान रहा.
      3. SMS अलर्ट मिळवा: प्रत्येक व्यवहारानंतर तुमच्या मोबाइलवर बँकेचा अलर्ट मिळाल्याची खात्री करा.
      4. कार्ड गहाळ झाल्यास तत्काळ रिपोर्ट करा: कार्ड हरवल्यास किंवा चोरी झाल्यास तात्काळ बँकेला कळवा आणि कार्ड ब्लॉक करा.

      क्रेडिट कार्डचे फायदे:

      • तुमच्याकडे पुरेशी रक्कम नसतानाही खरेदी करण्याची सुविधा.क्रेडिट कार्ड च्या माध्यतून तुम्हाला मिळते.
      • बिल वेळेवर भरल्यास कोणतेही व्याज लागत नाही.
      • विविध ऑफर, कॅशबॅक आणि डिस्काऊंट मिळतात.त्यामुळे तुम्हाला खूप कमी किंमत द्यावी लागते.

      डेबिट कार्डचे फायदे:

      • तुमच्या बचत खात्यातील रक्कम वापरून लगेच पेमेंट करता येते.
      • कर्ज न घेता फक्त तुमच्या खात्यातील रक्कम खर्च करता येते.

      कार्ड सुरक्षिततेचे नियम:

      • कार्ड वापरल्यावर पावती घ्या.
      • कोणत्याही अज्ञात ईमेल किंवा लिंकवरून कार्ड माहिती देऊ नका.
      • बँकेच्या अधिकृत वेबसाईट किंवा अ‍ॅपचा वापर करूनच ऑनलाईन व्यवहार करा.

      FAQs | Difference Between Debit Card and Credit Card

      1. क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये काय फरक आहे?

      क्रेडिट कार्ड: बँकेकडून कर्ज घेऊन तुम्ही खरेदी करता आणि नंतर ते परतफेड करता.
      डेबिट कार्ड: तुमच्या बँक खात्यातील उपलब्ध रक्कम वापरून तुम्ही खरेदी करता.

      2. ऑनलाईन खरेदीसाठी क्रेडिट/डेबिट कार्ड कसे वापरायचे?

      वेबसाइटवरून खरेदी करताना कार्डची माहिती भरा (कार्ड क्रमांक, वैधता तारीख, CVV) आणि मोबाइलवर आलेला OTP टाका.

      3. क्रेडिट कार्ड बिल कसे भरायचे?

      तुम्ही नेट बँकिंग, UPI, किंवा बँकेच्या अ‍ॅपद्वारे क्रेडिट कार्डचे बिल भरू शकता.

      4. क्रेडिट/डेबिट कार्ड हरवल्यास काय करावे?

      कार्ड हरवल्यास तात्काळ बँकेला कॉल करून कार्ड ब्लॉक करा आणि नवीन कार्डसाठी अर्ज करा.

      5. कार्डवरील OTP म्हणजे काय?

      OTP (One Time Password) हा एकवेळचा पासवर्ड असतो, जो ऑनलाईन पेमेंटच्या वेळी सुरक्षा उपाय म्हणून पाठवला जातो.

      तर अशाप्रकारे आपण (Difference Between Debit Card and Credit Card) क्रेडिट/डेबिट कार्ड म्हणजे काय? मराठी मध्ये जाणून घेतले आहे. क्रेडिट/डेबिट कार्ड चा वापर कसा करावा याबद्दल सर्व माहिती सुद्धा इथे पाहली आहे. तसेच  Debit Card चे फायदे तोटे, क्रेडिट Card चे फायदे तोटे. अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण येथे पाहिली आहेत. तर तुम्हाला क्रेडिट/डेबिट कार्ड म्हणजे काय या बद्दल माहीती असणे किती आवश्यक आहे, हे चांगले समजले असेल. जर तुमच्या मित्र परिवारा पैकी कोणाला कीवा क्रेडिट/डेबिट कार्ड म्हणजे काय आणि याचा वापर कसा करायचा माहिती नसेल तर हा लेख त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. जर तुम्हाला  (क्रेडिट/डेबिट कार्ड म्हणजे काय / आणि वापर कसा कसा केला जातो) या बद्दल अधिक प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये प्रश्न विचारू शकता..

      आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.

      आणखी हेही वाचा – IMPS Full Form In Marathi| आयएमपीएस फूल फॉर्म

      आणखी हेही वाचा – What Is Credit card | क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय ?

      आणखी हेही वाचा – CIBIL Score Full Form In Marathi | सीबील स्कोर चा फूल फॉर्म

      आणखी हेही वाचा – APBS Full Form In Marathi | ABPS चा फुल फॉर्म काय ?

      Sharing Is Caring: