LPA Full Form In Marathi | एलपीए म्हणजे काय

LPA Full Form In Marathi – मित्रांनो एलपीए हा शब्द तुम्ही बँकिंग क्षेत्रात, इंडस्ट्रियल कंपनी आयटी कंपनी आणि इतर ठिकाणी ऐकलाच असेल, तर आजच्या लेखामध्ये आपण एलपीए म्हणजे काय, त्याचा फुल फॉर्म काय, याविषयी सर्व माहिती आपण बघणार आहोत.

LPA Full Form In Marathi | एलपीए चा फूल फॉर्म काय

LPS stands for ‘Lakhs Per Annum.’ किंवा Lakhs Per Annual

मराठी भाषेत एलपीएला लाख प्रति वर्ष असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ, जर कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन ₹6,00,000 प्रति वर्ष असेल, तर त्याला “6 LPA” असे म्हणतात.
जसे की, 3 LPA म्हणजे Three Lakhs Per Annum ₹3,00,000 प्रति वर्ष असेल. असे म्हणतात.

LPA म्हणजे काय ?

  • LPA – हे एक आर्थिक टर्म आहे. आणि ते एका व्यक्तीच्या वार्षिक वेतनाच्या रकमेचे प्रतिनिधित्व करत असते.
  • कर्मचाऱ्याला कंपनीकडून वर्षाला मिळणारा सीटीसी (CTC) वार्षिक खर्च हे मोजमाप करण्यासाठी वापरले जाणारे एकक म्हणजे एलपीए (LPA). हे प्रत्येकी एका वर्षाला दिले जातात.
  • एलपीए म्हणजे एका वर्षातील ग्रॅास सॅलरी त्यामध्ये बेस वेतन, भत्ते, बोनस, विमा, निवृत्ती वेतन, ग्रॅज्युएटी, इतर लाभ येतात.
  • आणि CTC म्हणजे कंपनीच्या एका कर्मचाऱ्यांचा वार्षिक खर्च त्यामध्ये मुख्य वेतन आणि भत्ते व इतर वैद्यकीय निवृत्ती या सेवा सुविधांचा लाभ मिळणे.
  • या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की LPA एका वर्षातील ग्रॉस सॅलरी दर्शवते, तर CTC पूर्ण टोटल एक्सप्रेस चा खर्च दर्शवत असतो.

आणखी हेही वाचा – CTC Full Form in Marathi Salary | CTC कसा काढावा ?

LPA गणना कशी करावी

उदा . बेस वेतन: ₹5,00,000
भत्ते: ₹1,00,000 (HRA) + ₹20,000 (ट्रॅव्हल अलॉवन्स) = ₹1,20,000
बोनस: ₹30,000
वैद्यकीय विमा: ₹15,000
निवृत्तीवेतन योगदान: ₹36,000
ग्रॅच्युइटी: ₹20,000
इतर लाभ: ₹10,000 (लाइफ इन्शुरन्स) + ₹12,000 (शिक्षण भत्ता) = ₹22,000

एकूण LPA:

LPA=बेस वेतन+भत्ते+बोनस+वैद्यकीय विमा+निवृत्तीवेतन योगदान+ग्रॅच्युइटी+इतर लाभ

LPA=₹5,00,000+₹1,20,000+₹30,000+₹15,000+₹36,000+₹20,000+₹22,000

एकूण LPA: LPA=₹7,43,000 प्रतिवर्ष

तर मित्रांनो तर आज आपण LPA Full Form In Marathi आणी एलपीए म्हणजे काय ? LPA मधून मिळणारे फायदे आणि सुविधा व LPA आणि CTC मधील फरक समजला असेलच. सोबतच LPA कसा काढावा याबद्दल संपूर्ण माहिती समाविष्ट केलेली आहे. ही माहिती तुम्हा ला नक्कीच उपयुक्त पडेल अशी आशा आहे. आणि तुम्हाला LPA म्हणजे काय समजले असेल तर तुम्ही हा लेख तुमच्या त्या मित्रांना शेअर करा. ज्यांना LPA बद्दल माहिती नसेल.

आणि अश्याच माहिती साठी आमच्या लेखमराठी या वेबसाइट ला भेट द्या.

आणखी हेही वाचा –BCCI Full Form in Marathi | बीसीसीआय म्हणजे काय?

आणखी हेही वाचा – What Is The full Meaning Of a.t.m | ATM Full Form

LPA आणि CTC यामध्ये काय फरक आहे?

LPA म्हणजे कर्मचाऱ्याची फक्त वार्षिक वेतनाची एकूण रक्कम. व
CTC म्हणजे कंपनी तर्फे दिला जाणारा कर्मचाऱ्यावरचा एकूण खर्च, ज्यात LPA ची रक्कम, तसेच भत्ते, बोनस, विमा, PF, ग्रॅच्युइटी इत्यादी समाविष्ट असणे.

LPA म्हणजे काय?

LPA म्हणजे “Lakhs Per Annum.

LPA वर कर कसा लागू होतो?

LPA वर इनकम टॅक्स लागू होतो.

Sharing Is Caring:

Leave a Comment